journalist reply to Bilawal Bhutto Dainik Gomantak
देश

'मुस्लिम अधिकारीच ऑपरेशन सिंदूरमध्ये...': परदेशी पत्रकारानं बिलावल भुट्टोंना दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video

Bilawal Bhutto UN speech: या पत्रकार परिषदेत बिलावल यांनी भारतात 'मुसलमानांना राक्षस बनवले जात आहे' असा बिनबुडाचा आरोप केला

Akshata Chhatre

न्यूयॉर्क: पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो-झरदारी यांचा भारताविरोधी प्रचार करण्याचा प्रयत्न न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सपशेल फसला. मंगळवारी (दि. ३) झालेल्या या पत्रकार परिषदेत बिलावल यांनी भारतात 'मुसलमानांना राक्षस बनवले जात आहे' असा बिनबुडाचा आरोप केला. मात्र, त्यांच्या या प्रचाराला एका परदेशी पत्रकाराने तात्काळ आणि प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे बिलावल भुट्टो निःशब्द झाले.

भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने भुट्टो यांचा मुखभंग

परदेशी पत्रकाराने बिलावल भुट्टो यांना स्पष्टपणे सांगितले की, त्यांनी स्वतः भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'च्या ब्रीफिंगला उपस्थिती लावली होती आणि त्याचे नेतृत्व एका भारतीय मुस्लिम अधिकाऱ्याने केले होते. पत्रकाराच्या या टिप्पणीनंतर बिलावल भुट्टो यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते आणि ते केवळ मान हलवून गप्प राहिले.

'ऑपरेशन सिंदूर'च्या ब्रीफिंगचे नेतृत्व भारतीय लष्कराच्या कॉर्प्स ऑफ सिग्नल्सच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि भारतीय हवाई दलातील हेलिकॉप्टर पायलट विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांनी, तसेच परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी केले होते.

'दहशतवादाविरुद्ध सहकार्य' करण्याची इच्छा, पण..

एकीकडे भारताविरोधी प्रचाराचा प्रयत्न फसल्यानंतर, बिलावल भुट्टो यांनी दहशतवादाशी लढण्यासाठी भारतासोबत संवाद आणि गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करण्याची इच्छा व्यक्त केली. "पाकिस्तान अजूनही भारतासोबत दहशतवादाशी लढण्यासाठी सहकार्य करू इच्छितो. आपण १.५ किंवा १.७ अब्ज लोकांचे भविष्य बिगर-राज्य घटकांच्या आणि दहशतवाद्यांच्या हातात सोडू शकत नाही, ज्यामुळे दोन अणुशक्ती असलेल्या देशांमध्ये युद्ध सुरू होईल," असे भुट्टो म्हणाले.

मात्र, याच पत्रकार परिषदेत बिलावल भुट्टो यांनी एक महत्त्वाचे सत्य सार्वजनिकपणे मान्य केले. काश्मीर मुद्दा जागतिक स्तरावर, विशेषतः संयुक्त राष्ट्रांमध्ये, उपस्थित करण्याचे पाकिस्तानी सरकारचे प्रयत्न सातत्याने अयशस्वी ठरले आहेत, असे ते म्हणाले. "संयुक्त राष्ट्रांमध्ये आणि सामान्यतः, काश्मीरच्या मुद्द्यावर आम्हाला अजूनही अडथळे येत आहेत," असे बिलावल भुट्टो यांनी कबूल केले.

पाकिस्तानचे 'नरेटिव्ह' सेट करण्याचा प्रयत्न

सध्या बिलावल भुट्टो हे एका संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या शिष्टमंडळाला अलीकडील प्रादेशिक तणावावर इस्लामाबादचे म्हणणे मांडण्याचे काम देण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अधिकारी आणि मुत्सद्द्यांशी बोलताना भुट्टो म्हणाले की, पाणी विवाद आणि दहशतवाद यांसारख्या विषयांना काही प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

पाकिस्तानी शिष्टमंडळाची रचना भारताच्या अलीकडील राजनैतिक हल्ल्यासारखीच आहे, ज्यात पहलगाम हत्याकांडांनंतर नवी दिल्लीची भूमिका मांडण्यासाठी एक सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळ परदेश दौरा करत आहे.

सोमवारी (दि.२) न्यूयॉर्कमध्ये दाखल झाल्यानंतर, बिलावल भुट्टो यांच्या शिष्टमंडळाने संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस, महासभा अध्यक्ष फिलिमॉन यांग आणि सुरक्षा परिषद अध्यक्ष कॅरोलिन रॉड्रिग्स-बर्केट यांच्याशी बैठका घेतल्या. त्यांनी अमेरिका, चीन, रशिया आणि फ्रान्स या सुरक्षा परिषदेच्या चार स्थायी सदस्यांच्या कायमस्वरूपी प्रतिनिधींशी तसेच अस्थायी सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींशीही संवाद साधला. विशेष म्हणजे, बुधवारी (दि.४) पाकिस्तानी शिष्टमंडळ वॉशिंग्टन डीसीमध्ये पोहोचणार आहे, त्याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळही तिथे उपस्थित राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

SCROLL FOR NEXT