Operation Sindoor: 8 तासांत पाकड्यांचं काम तमाम... सीडीएस अनिल चौहान यांनी सांगितली 'ऑपरेशन सिंदूर'ची Inside Story

CDS Anil Chauhan On Operation Sindoor: सीडीएस जनरल अनिल चौहान यांनीही पुण्यात बोलताना भारताने पाकिस्तानच्या नापाक हरकतीवर चोख प्रत्युत्तर दिल्याचे म्हटले. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद यावर भाष्य केले.
CDS Anil Chauhan On Operation Sindoor
CDS Anil Chauhan On Operation SindoorDainik Gomantak
Published on
Updated on

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने पाकिस्तानात घुसून कारवाई करुन घेतला. पाकड्यांची भारताने चांगलीच खोड मोडली. आता यापुढे पाकिस्तान नापाक हरकत करण्याच्या आगोदर दोन वेळा विचार करेल. सीडीएस जनरल अनिल चौहान यांनीही पुण्यात बोलताना भारताने पाकिस्तानच्या नापाक हरकतीवर चोख प्रत्युत्तर दिल्याचे म्हटले. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद यावर भाष्य केले.

पाकिस्तानला स्पष्ट इशारा देताना सीडीएस चौहान म्हणाले की, ''भारत दहशतवादाच्या सावटात राहणारा देश नाही. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये अत्यंत क्रूरतापूर्ण हल्ला केला. या भ्याड हल्ल्यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर दिले. ऑपरेशन सिंदूरचा हेतू पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना धडा शिकवणे होता. 48 तास चालेल असे वाटणारे ऑपरेशन भारतीय लष्कराने अवघ्या 8 तासांत यशस्वीरित्या पार पाडले. युद्धात तोटा नाहीतर निकाल महत्त्वाचे असतात.''

CDS Anil Chauhan On Operation Sindoor
Operation Sindoor: जर ऑपरेशन सिंदूर आणखी एक आठवडा चालू राहिलं असतं तर... बलुच नेत्याचं PM मोदींना खुलं पत्र

सीडीएस चौहान पुढे म्हणाले की, युद्ध हे मानवी संस्कृतीइतकेच जुने आहे. कोणत्याही प्रकारच्या युद्धात दोन महत्त्वाचे घटक असतात. हिंसाचार आणि त्यामागील राजकारण. तिसरा मुद्दा म्हणजे संवाद, जो सतत होत असतो. 10 मे रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानचे लक्ष्य 48 तासांत भारताचे मोठे नुकसान करण्याचे होते. सीमेपलीकडून अनेक हल्ले करण्यात आले. पाकिस्तानने (Pakistan) हा संघर्ष ताणला. मात्र आपल्या लष्कराने केवळ आणि केवळ दहशतवाद्यांच्या तळांवर लक्ष केंद्रीत करुन हल्ले केले.

CDS Anil Chauhan On Operation Sindoor
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये 64 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा! इंडियन आर्मीचा मोठा खुलासा; 90 हून अधिक जखमी

असीम मुनीर यांनी गरळ ओकली

सीडीएस जनरल चौहान पुढे असेही म्हणाले की, ''यानंतर पाकिस्तानने फोन करुन त्यांना चर्चा करायची असल्याचे म्हटले. ऑपरेशन सिंदूरमध्ये युद्धासोबत राजकारणही सुरु होते. युद्ध हा राजकारणाचा एक भाग आहे. भारताला (India) हानी पोहोचवणे हाच पाकिस्तानचा मुख्य हेतू आहे. पहलगाममध्ये घडलेल्या घटनेच्या काही आठवड्यांपूर्वी पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी भारत आणि हिंदूंविरुद्ध गरळ ओकली होती.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com