Crime News Dainik Gomantak
देश

Rajasthan Crime: राजस्थानमध्ये मारहाणीत मुस्लीम तरुण ठार; दुसरा पळाला म्हणून बचावला

Rajasthan Crime: राजस्थानमधील भिवडी येथे एका 24 वर्षीय मुस्लिम तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली, तर त्याचा साथीदार जीव वाचवण्यासाठी पळून गेला.

Manish Jadhav

Rajasthan Crime: राजस्थानमधील भिवडी येथे एका 24 वर्षीय मुस्लिम तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली, तर त्याचा साथीदार जीव वाचवण्यासाठी पळून गेला. रस्त्याने चालत असताना किरकोळ टक्कर आणि नंतर वादावादीनंतर ही घटना घडली. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, तर दोघे अद्याप फरार आहेत. भिवडीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिलीप सैनी म्हणाले की, 'अचानक चिथावणी दिल्याने ही घटना प्रथमदर्शनी घडली. आशिष पाल गुर्जर नावाच्या आरोपीला आम्ही ताब्यात घेतले आहे. अन्य दोन आरोपी आणि घटनेत वापरलेल्या कारचा शोध सुरु आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफसर अली असे पीडितेचे नाव असून, तो बिहारमधील समस्तीपूरचा रहिवासी असून तो भिवडीतील घाटल परिसरात असलेल्या एका कारखान्यात 8 वर्षांपासून काम करत होता. एएसपी म्हणाले की, 'मंगळवारी दुपारी अली आणि त्याचा मित्र ताहिबुल कारखान्यातून जेवणासाठी घरी जात होते. त्याच क्षणी ही घटना घडली. ते रस्त्याने जात असताना त्यांच्या समोरुन भरधाव वाहन आले. यामुळे ते मागे हटले असता आशिष आणि त्याच्या मित्रांची कारला किरकोळ टक्कर झाली.

सैनी पुढे म्हणाले की, 'घटनेनंतर अली आणि आरोपीमध्ये वाद झाला. यानंतर अली आणि ताहिबुल पुढे सरसावले त्यामुळे आशिष गाडी घेवून निघून गेला. मात्र, काही वेळातच तिघेही आरोपी परत आले आणि त्यांनी अली आणि ताहिबुल यांच्यावर रॉडने हल्ला केला. ताहिबुल तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र तिघांनी अलीला बेदम मारहाण केल्याने तो बेशुद्ध झाला आणि जमिनीवर पडला. यानंतर तिन्ही आरोपी कारसह घटनास्थळावरुन पसार झाले. ताब्यात घेतलेल्या आशिषलाही किरकोळ दुखापत झाली होती.'

दरम्यान, आरोपी निघून गेल्यानंतर ताहिबुल परत आला आणि अलीला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेला. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध भादंवि कलम 302/34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सैनी म्हणाले की, 'पोस्टमॉर्टमनंतर पीडित अलीचा मृतदेह बिहारमधील त्याच्या गावी पाठवण्यात आला आहे. आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपींना ओळखण्यासाठी अनेकांची चौकशी केली. इतर दोघांचीही ओळख पटलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2024: इफ्फीत काय आणि कुठे पाहाल? संपूर्ण माहिती घ्या एका क्लिकवर..

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

Tuberculosis: क्षय रोगाला हद्दपार करण्यासाठी मिळाले स्टार बूस्ट!! वर्षा उसगावकर आणि जॉन डी सिल्वा गोव्याचे 'टीबी ब्रँड ॲम्बेसेडर'

Mormugao Port: गोव्यात क्रूझ पर्यटन हंगाम सुरू; एकाच दिवशी कॉर्डेलिया आणि जर्मनीहून जहाजं दाखल

SCROLL FOR NEXT