Marriage Dainik Gomantak
देश

Love Jihad in Uttar Pradesh: धर्म बदलून अल्पवयीन हिंदू मुलीसोबत करायचं होतं लग्न; त्यानंतर जे घडलं त्यावर...!

Crime News: उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका हिंदू मुलीच्या धर्मांतराची तयारी सुरु होती. एका अल्पवयीन हिंदू मुलीचा विवाह मुस्लिम तरुणाशी होणार होता.

Manish Jadhav

Love Jihad Crime in Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका हिंदू मुलीच्या धर्मांतराची तयारी सुरु होती. एका अल्पवयीन हिंदू मुलीचा विवाह मुस्लिम तरुणाशी होणार होता. मौलवीची वाट पाहिली जात होती. लग्नाची सर्व तयारीही पूर्ण झाली होती.

मात्र त्यापूर्वीच पोलीसांनी घटनास्थळ पोहोचून या जोडप्याला पकडले. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी करुन कारवाई करण्यासंबंधी सांगितले आहे.

दरम्यान, एतमाउदुल्ला पोलिस स्टेशनच्या प्रकाश नगरमध्ये, पोलिसांना स्थानिक लोकांकडून माहिती मिळाली की, एक मुस्लिम तरुण एका अल्पवयीन हिंदू मुलीशी लग्न करत आहे.

माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी पोहोचले. त्यांना एका घरात एक मुलगी आणि एक मुस्लिम तरुण बसलेले आढळले.

मुलीचे नाव बदलले

दोघेही मौलवीची वाट पाहत होते. पोलिसांच्या चौकशीत मुलीने तिचे खरे नाव रचना असल्याचे सांगितले. मुस्लिम तरुण साहिलने तिचे नाव बदलून रुखसार ठेवले होते.

तो मूळचा अलीगढचा रहिवासी आहे. साहिल नोएडामध्ये एका फॅक्टरीत काम करत होता. सहा महिन्यांपूर्वीच रचनाची साहिलशी ओळख झाली होती. तीन महिन्यांपूर्वी ती साहिलसोबत राहायला सुद्धा गेली होती.

दुसरीकडे, धर्म बदलून साहिलने तिच्याशी लग्न करण्याचा बेत आखला होता. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला पकडले. डीसीपी सिटी विकास कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी (Accused) तरुणाची चौकशी सुरु आहे.

तीन महिन्यांपूर्वी नोएडामध्ये अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. आरोपी तरुण तीन महिन्यांपासून तिच्यासोबत नोएडा येथून पळून गेला होता. येथून ते पहिल्यांदा ग्वाल्हेरला गेले नंतर ते आग्र्याला आले.

हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली

गेल्या शुक्रवारी तो धर्मांतर करुन लग्न करणार होता. रचनाच्या म्हणण्यानुसार, साहिलने तिला केवळ मांसाहारच करायचा शिकवले नाही तर तिचे नाव बदलून रुखसार ठेवले होते.

डीसीपी सिटी विकास कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडा येथील पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. जे काही तथ्य समोर येईल, त्यानुसार कारवाई केली जाईल. सध्या मुलीला नोएडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत नातेवाईकांनाही कळवण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT