Mumbai High Court Dainik Gomantak
देश

Mumbai High Court: गोष्ट, 93 वर्षांच्या दुर्दैवी आईची! संपत्तीसाठी मुलींमध्ये वाद; वृद्धेच्या व्यथेची कोर्टाकडून दखल

Property Dispute: आयुष्याच्या शेवटच्या क्षणी वयोवृद्धांना निवांत जगता आलं पाहिजे, मात्र, अशा एका दुर्दैवी आईला वयाच्या 93 व्या वर्षी पोटच्या मुली संपत्तीसाठी भांडताना पाहावे लागत आहे.

Ashutosh Masgaunde

93 years Old Mother Suffering in Property Disputes:

दोन मुलींच्या भांडणाला त्रासलेल्या ९३ वर्षीय वृद्ध आईची व्यथा मुंबई उच्च न्यायालयाने मांडली. न्यायालयाने नमूद केले की, वृद्ध आई तिच्या आयुष्याच्या अखेरीस अत्यंत वेदनादायक परिस्थितीतून जात आहे, आईला तिच्या दोन मुलींमध्ये सौहार्दपूर्ण संबंध हवे आहेत.

वडिलांच्या मालमत्तेच्या वादातून वृद्ध आईच्या दोन मुलींमध्ये भांडण झाले. नात्यातील तणावामुळे मुलीला आईला भेटणेही कठीण झाले आहे. अशात मुलीने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

न्यायालयाने वकील नेमून मागवला अहवाल

याचिकेच्या सुनावणीदरम्यान आईची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन न्यायालयाने सध्या पेडर रोड परिसरात असलेल्या बंगल्याच्या आवारात याचिकाकर्त्या मुलीला आठवड्यातून तीन दिवस (सोमवार, बुधवार, शुक्रवार) भेटण्याची परवानगी दिली आहे.

मुलीने याचिकेत दावा केला आहे की, तिच्या बहिणीने आईला बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवले आहे. त्यामुळे ती आईला भेटू शकत नाही.

न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने याचिकेचा विचार करून स्वतंत्र वकिलाची नियुक्ती करत, आईची इच्छा जाणून घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

स्वतंत्र वकिलांनी सादर केलेल्या अहवाल वाचल्यानंतर खंडपीठाने आपले निरीक्षण नोंदवले.

सुनावणीदरम्यान वृद्ध आईच्या दुसऱ्या मुलीचे वकील जमशीद मास्तर यांनी या याचिकेला कडाडून विरोध केला आणि याचिकाकर्त्याला कोणताही दिलासा न देण्याची विनंती केली.

विशेष म्हणजे वडिलांच्या मालमत्तेवरून वृद्ध महिलेच्या दोन मुलींमध्ये भांडण सुरू आहे. दोन्ही बहिणींनी एकमेकांविरुद्ध दिवाणी आणि फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. त्यांनी एकमेकांवर गंभीर आरोपही केले आहेत.

दोन बहिणींमधील भांडणामुळे आई अत्यंत दुखावलेली आहे. कारण वडिलांनी मृत्यूपूर्वी दोन्ही मुलींना खूप काही दिले होते. असे असूनही, मुलींचे भांडणामुळे आईला तळमळते आणि तिला आपल्या दोन्ही मुलींची लाज वाटत आहे. 93 वर्षीय व्यक्ती आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत कोणत्या दुःखद परिस्थितीतून जात आहे, हे पाहून आम्हाला वेदना होत आहेत.
न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे

आईला भेटण्यावेळी याचिकारकर्त्या मुलीला अटी

खटल्याशी संबंधित परिस्थिती आणि वृद्ध महिलेचे वय पाहता खंडपीठाने याचिकाकर्ती मुलगी, तिचा पती आणि मुलांना आईला भेटण्याची परवानगी दिली.

मुलगी जेव्हा आईला भेटायला जाते तेव्हा तिच्यासोबत कोणताही वकील किंवा सीए जाऊ शकत शकणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. तसेच भेटीची व्हिडिओग्राफी करण्यास परवानगी नसेल.

भेटीदरम्यान, आईची काळजी घेणारी परिचारिका एवढ्या अंतरावर उभी असावी जिथून तिला वृद्ध महिला दिसेल. परंतु, भेटीदरम्यान ते काय बोलत आहेत, परिचारिकेला ऐकू येऊ नये.

एका तासाच्या भेटीवेळी दुसऱ्या मुलीच्या कुटुंबातील कोणताही सदस्य तथे उपस्थित राहू शकणार नाही. आता खंडपीठाने याचिकेवर ७ जुलै रोजी सुनावणी ठेवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT