Nawab Malik Dainik Gomantak
देश

ड्रग्ज प्रकरणी नवाब मलिकांचा एनसीबीवर जोरदार हल्ला

शाहरुख खानच्या मुलाला एका क्रूझवरुन एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अमली पदार्थाच्या सेवनासंबंधी ताब्यात घेतले होते.

दैनिक गोमन्तक

देशात राजीव गांधी पंतप्रधान असताना 30 ऑगस्ट 1985 एनडीपीएस कायदा पारीत करण्यात आला. 16 सप्टेंबर 1985 मध्ये या कायद्यास मंजूी दिली. मुख्य म्हणजे या कायद्याचा उद्देश देशात नशामुक्ती करण्याचा होता. त्यानुसार एनसीबीची स्थापना करण्यात आली. त्याचवेळी राज्यांनाही त्यासंबंधीचे अधिकार देण्यात आले. मागील 36 वर्षापासून ही यंत्रणा काम करत आहे. देशातील सगळे राजकिय पक्ष या एजन्सीचा आदर करतात. मागील एक वर्षापासून एनसीबीच्या कारवाया मुंबईमध्ये वाढल्या आहेत. सुशांत प्रकरणाच्या चौकशीपासून मुबंईतील एनसीबी कार्यालय चांगलेच प्रकाशाझोतामध्ये आले. बॉलिवूड कलाकारांना एनसीबी अधिकाऱ्यांकडून ड्रग्ज प्रकारणात सातत्याने बोलवून त्यांची चौकशी केली. मात्र आता एनसीबीची भूमिका संशयास्पद असल्याचे समोर येत आहे.

यातच बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानच्या मुलाला एका क्रूझवरुन एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अमली पदार्थाच्या सेवनासंबंधी ताब्यात घेतले. दरम्यान आर्यन आणि आरबाजला क्रूझवरुन मनिष भानुशाली, के. पी गोसावी या प्रॉड एनसीबी अधिकाऱ्यानी ताब्यात एनसीबीकार्यालयाकडे घेऊन जाताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र मनिष भानुशाली हा भाजपचा पदाधिकारी असल्याचा मोठा खुलासा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. आर्यनला हा अज्ञात प्रॉड एनसीबी अधिकारी कसा काय घेऊन जात आहे, असा सवाल ही यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे.

तसेच, ''विशेष म्हणजे मनिष भानुशाली आणि के. पी. गोसावी यांचा फोटो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर दिसत आहेत. त्याचबरोबर मनिष भानुशाली २२ तारखेला दिल्लीतील भाजप नेत्यांबरोबर होते. त्यानंतर तो गुजरातमधील भाजप नेत्यांबरोबर दिसला आहे. त्यामुळे हा भानुशाली भाजपचा कोणता पदाधिकारी आहे हे आम्हाला आता जाणून घ्यायचे आहे. तसेच अरबाज आणि आर्यन यांच्यावर भानुशाली आणि गोसावी यांनी का कारवाई केली हे ही एनसीबीने सांगावे. अधिकारी या प्रॉड व्यक्तींच्या माध्यमातून खंडणी वसूल करत आहेत हे ही एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगावे,'' असही मलिक यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT