Mrunal Thakur Apologizes Dainik Gomantak
देश

Mrunal Thakur Apologizes: बिपाशाला 'पुरुषांसारखी' म्हणणं मराठमोळ्या अभिनेत्रीला पडलं महागात; नेटकऱ्यांच्या टीकेनंतर मागितली माफी, म्हणाली- 'मी 19 वर्षांची...'

Mrunal Thakur Apologizes to Bipasha Basu: बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला.

Sameer Amunekar

Mrunal Thakur Reply To Bipasha Basu Controversy

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये तिने अभिनेत्री बिपाशा बासूच्या शरीराबद्दल केलेली टिप्पणी वादग्रस्त ठरली.

हा व्हिडिओ मृणाल फक्त १९ वर्षांची असताना दिलेल्या एका मुलाखतीचा असल्याचं सांगितलं जात आहे. त्यात तिने बिपाशाच्या शरीरयष्टीविषयी बोलताना तिच्या मसल्सचा उल्लेख केला आणि बॉडीशेमिंग केल्याचं नेटकऱ्यांना वाटलं. याशिवाय, स्वतःला बिपाशापेक्षा सुंदर असल्याचे वक्तव्यही तिने केले होते. या वक्तव्यामुळे नेटकऱ्यांकडून तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका सुरू झाली.

जुना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मृणालविरोधात संतापाची लाट उसळली. अनेकांनी तिच्या वक्तव्याला ‘अभिनेत्रीला शोभणारं नाही’ अशी टीका केली. वाढत्या ट्रोलिंगच्या पार्श्वभूमीवर अखेर मृणाल ठाकूरने आपली भूमिका स्पष्ट करत जाहीर माफी मागितली.

मृणालने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले – "मी १९ वर्षांची असताना अनेकदा काही गोष्टी बोलून गेले. त्या वेळी माझ्या शब्दांचे किती महत्त्व असू शकते किंवा अगदी गंमत म्हणून वापरलेले शब्दही कोणाला किती दुखावू शकतात, हे मला कळलं नव्हतं. आता मात्र मला त्याचं गांभीर्य समजलं आहे आणि मी त्याबद्दल मनापासून माफी मागते."

Mrunal Thakur Apologizes

तिने पुढे लिहिलं – "माझा हेतू कधीच कोणाचा अपमान करण्याचा नव्हता. मात्र आता अनुभवाने समजलं आहे की, सौंदर्य आणि आकर्षण अनेक प्रकारांनी व्यक्त होतं. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची वेगळी ओळख आणि व्यक्तिमत्त्व असतं, जी आदराने स्वीकारायला हवी."

मृणालच्या या जाहीर माफीनंतर बिपाशा बासूच्या चाहत्यांचा आणि नेटकऱ्यांचा रोष काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT