Cristiano Ronaldo: सुपरस्टार 'रोनाल्डो' खेळणार गोव्यात? चाहत्यांचे AFC लीगकडे लक्ष; FC Goa च्या गटात येण्याची आतुरता

Cristiano Ronaldo AFC Champions League: या प्रतिष्ठित स्पर्धेत सौदी अरेबियन संघ मोहन बागान सुपर जायंट्स किंवा एफसी गोवाच्या गटात आल्यास चाळीस वर्षी जगप्रसिद्ध स्ट्रायकर कोलकात्यात किंवा गोव्यात खेळू शकतो.
Cristiano Ronaldo
Cristiano RonaldoDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: फुटबॉलमधील जागतिक सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोचा अल नासर क्लब एएफसी चँपियन्स लीग २ फुटबॉलमध्ये आहे. आशियातील या प्रतिष्ठित स्पर्धेत सौदी अरेबियन संघ मोहन बागान सुपर जायंट्स किंवा एफसी गोवाच्या गटात आल्यास चाळीस वर्षी जगप्रसिद्ध स्ट्रायकर कोलकात्यात किंवा गोव्यात खेळू शकतो.

रोनाल्डो भारतात खेळल्यास देशातील फुटबॉलप्रेमींच्या दृष्टीने ती फार मोठी घटना ठरेल. मालकी हक्क कराराचे (एमआरए) अजून नूतनीकरण न झाल्यामुळे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा होण्याबाबत अनिश्चितता आहे. एएफसी चँपियन्स लीग २ स्पर्धेत देशातील दोन संघ खेळत असल्याने सप्टेंबरपासून फुटबॉलची वातावरण निर्मिती होईल. या स्पर्धेसाठी आशियातील पूर्व व पश्चिम विभागात मिळून ३२ संघ पात्र ठरले आहेत.

पश्चिम विभागातील १६ संघांची ‘ड्रॉ’साठी प्रत्येकी चार संघ अशा चार गटांत विभागणी करण्यात आली आहे. स्पर्धेचा ड्रॉ शुक्रवारी (ता. १५) दुपारी मलेशियातील कुआलांलपूर येथे काढण्यात येईल. त्यावेळी स्पर्धेची गटवारी निश्चित होईल. एफसी गोवाने बुधवारी रात्री फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर संघर्षपूर्ण प्ले-ऑफ लढतीत ओमानच्या अल सीब क्लबला २-१ फरकाने नमवून एएफसी चँपियन्स लीग २ स्पर्धेच्या गटसाखळीसाठी पात्रता मिळविली.

आशियाई क्लब स्पर्धेत एफसी गोवा संघ दुसऱ्यांदा खेळणार आहे. यापूर्वी त्यांनी २०२१ मध्ये एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेच्या गटसाखळीत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. आयएसएल लीग विनर्स शिल्ड जिंकल्यामुळे मोहन बागान एएफसी चँपियन्स लीग २ स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

Cristiano Ronaldo
AFC Champions League: FC Goaची लागणार कसोटी, अल सीबविरुद्ध रंगणार सामना

या स्पर्धेत प्रथमच दोन भारतीय संघ खेळतील. नियमानुसार, एकाच देशातील दोन संघ एका गटात नसतील. ‘ड्रॉ’साठी मोहन बागान क, तर एफसी गोवा ड गटात आहे. अल नासरचा समावेश अ गटात आहे. ड्रॉ प्रक्रियेनुसार रोनाल्डो भारतात खेळण्याची ५० टक्के, तर गोव्यात खेळण्याची २५ टक्के शक्यता असल्याचे जाणकार मानतात.

Cristiano Ronaldo
AFC Champions League 2: FC Goa समोर ओमानमधील अल सीब क्लबचे खडतर आव्हान, सुपर कपनंतर रंगणार सामना

रोनाल्डो २०२७ पर्यंत अल नासर संघात

या वर्षी जून महिन्यात अल नासर क्लबने ख्रिस्तियानो रोनाल्डो याचा करार २०२७ पर्यंत वाढविला. एका वृत्तानुसार, पुढील दोन वर्षांसाठी करारबद्ध करताना सौदी अरेबियातील श्रीमंत क्लबने रोनाल्डोशी सुमारे २००० कोटी रुपयांचा करार केला आहे, याशिवाय इतर बोनस आणि संघात १५ टक्के मालकी हक्कही आहेत. युरोपियन क्लब फुटबॉल मैदाने गाजवून रोनाल्डो २०२३ मध्ये अल नासर क्लबमध्ये दाखल झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com