Madhya Pradesh Crime Dainik Gomantak
देश

Madhya Pradesh Crime: मुस्लिम मुलीशी लग्न केल्याच्या कारणावरुन हिंदू तरुणाची हत्या, खळबळजनक घटनेने उडाला थरकाप!

Madhya Pradesh: राजस्थानमधील एका 36 वर्षीय हिंदू व्यक्तीला त्याच्या पत्नीच्या कुटुंबीयांनी त्याच्या आंतरधर्मीय विवाहासाठी बेदम मारहाण केली.

Manish Jadhav

Madhya Pradesh Crime: मध्यप्रदेशातील खांडवामधून खळबळजनक खुनाची घटना आता उघडकीस आली आहे.

राजस्थानमधील एका 36 वर्षीय हिंदू व्यक्तीला त्याच्या पत्नीच्या कुटुंबीयांनी त्याच्या आंतरधर्मीय विवाहासाठी बेदम मारहाण केली, असे पोलिसांनी बुधवारी सांगितले.

जयपूर येथील रहिवासी 36 वर्षीय राजेंद्र सैनी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो रोजंदारीचे काम करायचा.

दरम्यान, खांडवा जिल्ह्यातील सिंगोट गावात घडलेल्या घटनेप्रकरणी पोलिसांनी (Police) राजेंद्र सैनीचे सासरे मुमताज खान (55), त्यांची पत्नी मुन्नी खान (52) आणि त्यांचा मुलगा सलमान खान (19) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तपास अधिकारी उपनिरीक्षक हरी कृष्ण सोनी यांनी सांगितले की, राजेंद्र सैनी दोन वर्षांपूर्वी एप्रिल 2021 मध्ये खंडवा येथे आला होता. त्यादरम्यान त्याची भेट 20 वर्षीय अमरीन खानशी झाली होती. त्यानंतर दोघांनी जयपूर कोर्टात लग्न केले आणि तिथेच राहू लागले.

यानंतर, अमरीनच्या कुटुंबीयांनी सिंगोट पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. कारवाई करत पोलिसांनी अमरीन खानची सुटका केली आणि 2021 मध्ये या जोडप्याला जयपूरहून खंडवा येथे आणले.

आपण प्रौढ असून कोणत्याही दबावाशिवाय राजेंद्रशी लग्न केल्याचे अमरिनने सांगितले. विशेष म्हणजे, आपण राजेंद्रबरोबर खूश असल्याचे देखील अमरिनने सांगितले होते.

दुसरीकडे, दोन महिन्यांपूर्वी अमरीन कुटुंबीयांच्या निमंत्रणावरुन त्यांना भेटण्यासाठी खांडवाला आली होती. ती परत न आल्याने राजेंद्र तिला घेण्यासाठी आला, यादरम्यान अमरीनच्या कुटुंबीयांनी तिला दोनदा मारहाण केली.

सोमवारी तो पुन्हा अमरीनला परत घेण्यासाठी गेला, परंतु कुटुंबीयांनी त्यालाही बेदम मारहाण केली. या भांडणात गंभीर जखमी झालेल्या राजेंद्रने पोलिसांना माहिती दिली.

त्यानंतर, राजेंद्रला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मंगळवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. आरोपींवर हत्येचे कलम 302 लावण्यात येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

यानंतर, तीन मुख्य आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खंडवाचे पोलीस अधीक्षक सत्येंद्र शुक्ला म्हणाले की, पोलिसांनी आधी आरोपींविरुद्ध (Accused) आयपीसीच्या कलम 323 (दुखापत करणे) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत एफआयआर नोंदवला होता. आता खुनाचे कलमही लावण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

COD Fraud: ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ करताय? लागू शकतो चुना; मुरगावात भामट्यांची टोळी सक्रिय, 12 जणांची फसवणूक

Verca: 'शाळा का चुकवली'? पालक ओरडल्याने 2 विद्यार्थी गोव्यातून पळाले; पोलिसांच्या सतर्कतेमुळे सापडले भुसावळमध्ये

Hockey Asia Cup 2025 Final: टीम इंडियाने रचला इतिहास! चौथ्यांदा जिंकला 'आशिया कप', फायनलमध्ये कोरियाचा उडवला धुव्वा; पाकिस्तानलाही पछाडले

एअरलाईन्स कंपन्या गोव्याला सोडून इतर राज्यांना प्राधान्य देतायेत... सरकारच्या धोरणांचा राज्याचा पर्यटनाला फटका, आलेमाव यांचा आरोप

Goa Flood Relief: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गोवा सरसावला! पंजाब आणि छत्तीसगडला आर्थिक मदतीची घोषणा; देणार प्रत्येकी 5 कोटी रुपये

SCROLL FOR NEXT