Bihar Crime: बिहारमधील मोतिहारीमध्ये तालिबानी शिक्षेचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. येथे पंचायतीत एका जोडप्याला मारहाण करण्यात आली. पीडित मुलगा अल्पवयीन आहे तर महिलेचे या मुलाशी प्रेमसंबंध होते. ती त्याच्यासोबत पळून गेली होती.
त्यानंतर घरच्यांनी त्यांना पकडून संपूर्ण गावासमोर शिक्षा दिली. मुलाला आणि महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, बंजारिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका विवाहित महिलेचे 14 वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध होते. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये तिचे लग्न झाले होते.
लग्नानंतरही (Marriage) ती तिच्या माहेरीच राहत होती. यादरम्यान ती त्या मुलाच्या प्रेमात पडली, त्यानंतर दोघेही पळून गेले. यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी त्यांना पकडले.
याबाबत गुरुवारी पंचायत बोलावण्यात आली. हे प्रकरण पोलीस ठाण्यात नेण्यापेक्षा गावपातळीवरच निर्णय घ्यावा, असे पंचायतीमध्ये ठरले. यानंतर पंचायतीने दोघांनाही त्यांच्या चुकीची शिक्षा द्यावी, असा निकाल दिला.
महिलेच्या घरच्यांनी महिलेला मारायचे तर मुलाच्या घरच्यांनी मुलाला मारायचे असा निर्णय पंचायतीने दिला. गावातील इतर मुलांनी अशी चूक करु नये असा इशाराही पंचायतीने दिला.
यानंतर महिलेच्या आईने तिला सर्वांसमोर मारायला सुरुवात केली तर मुलाच्या घरच्यांनी सर्वांसमोर मुलाला बेदम मारहाण केली. यादरम्यान दोघेही आपल्याला सोडण्यात यावे अशी विनंती करत होते.
मुलगा विवाहित महिलेपेक्षा चार वर्षांनी लहान असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांचा धर्मही वेगळा आहे. तिने चूक केली, घराची इज्जत गेली, म्हणून तिला शिक्षा झाल्याचे मुलीच्या आईने सांगितले.
दुसरीकडे, मुलाला मार देणाऱ्या आजोबांनी सांगितले की, त्याने केलेल्या चुकीची शिक्षा त्याला मिळाली आहे. दरम्यान, या प्रकरणी दोघांच्या नातेवाईकांना पोलीस (Police) ठाण्यात बोलावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यांनी मुलाला त्याच्या चुकीबद्दल त्यांच्या स्तरावर शिक्षा दिल्याचे सांगितले, त्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.