Monsoon Arrived In Kerala Dainik Gomantak
देश

Monsoon Arrived In Kerala: 16 वर्षानंतर पहिल्यांदाच असं घडतंय, केरळमध्ये 8 दिवस आधीच पावसाचं आगमन

Monsoon Updates: नैऋत्य मान्सून आज म्हणजेच २४ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, यंदा मान्सूनने नियोजित वेळेच्या आठ दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे.

Sameer Amunekar

Monsoon 2025

देशात मान्सूनच्या आगमनाच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. यंदा दक्षिण-पश्चिम मान्सूनने केरळमध्ये नियोजित वेळेच्या सुमारे आठवडा आधीच म्हणजेच २४ मे रोजी दाखल झाला आहे. १६ वर्षानंतर पहिल्यांदाच एवढ्या लवकर पावसाचं आगमन होत आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सांगितले की, राज्यात मान्सूनच्या आगमनासाठी आवश्यक सर्व हवामानीय घटक सक्रिय झाले होते, ज्यात दक्षिण-पश्चिम वारे, ढगांचे गडद पट्टे, समुद्रावरील कमी दाबाचा पट्टा आणि विशिष्ट तापमान स्थिती यांचा समावेश आहे.

गेल्या दोन दिवसांपासून केरळच्या अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे मान्सूनचे आगमन अधिकृतरित्या घोषित करण्यात आले. सामान्यतः मान्सून १ जूनच्या आसपास केरळमध्ये पोहोचतो. मात्र यंदा पावसाच आगमन लवकर झालं आहे. मान्सूनचे सर्वात उशिरा आगमन १९७२ मध्ये १८ जून रोजी नोंदवले गेले होते.

हवामान विभागाने कोकण, गोवा, केरळ व कर्नाटकच्या किनारी भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः २९ मेपर्यंत केरळ आणि कर्नाटकच्या किनाऱ्यावर प्रचंड पाऊस आणि ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच, तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातही पुढील पाच दिवस पावसाची शक्यता आहे.

सध्या दक्षिण कोकणच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, जे २४ मे रोजी सकाळी रत्नागिरीपासून अंदाजे ४० किमी वायव्येस होते. हे क्षेत्र आज सकाळपर्यंत रत्नागिरी आणि दापोली दरम्यान किनारा ओलांडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Damu Naik: 118 सभा, दोन्‍ही जिल्‍हा पंचायतींवर स्‍पष्‍ट बहुमत; 'दामू नाईकां'च्‍या प्रदेशाध्‍यक्षपदाला एक वर्ष पूर्ण

"गोव्याचे पर्यावरण, वन संवर्धनासाठी गरज पडल्यास कायद्यात बदल करु"! CM सावंतांचे प्रतिपादन; ‘गोवा वन विविधता महोत्सवा’चे उद्‌घाटन

वरिष्ठ अभियंत्याला भ्रष्टाचाराच्या चौकशीपासून वाचवण्याचा डाव? 350 कोटींचे घोटाळे रडारवर; ‘युनायटेड गोवन्स'ची सीव्हीसीकडे तक्रार दाखल

Goa Ranji Cricket: गोवा क्रिकेटसाठी महत्वाची बातमी! 'हा' धाकड खेळाडू परतला रणजी संघात, चौघांना वगळले; वाचा संपूर्ण यादी..

Gegeneophis Valmiki: पश्चिम घाटात सापडली उभयचर प्राण्याची 'नवी' प्रजाती! दुर्मीळ केशिलियन; 'जेनेओफीस वाल्मिकी' असे नामकरण

SCROLL FOR NEXT