Court Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh Crime: लैंगिक छळ करणाऱ्या शिक्षकाला कंटाळून मुलींनी शाळेत जाणं बंद केलं, अखेर हायकोर्टात याचिका; 'मास्तराला अटक करा तरच...'

Uttar Pradesh: आग्रा जिल्ह्यातील शमशाबाद ब्लॉकमधील सरकारी प्राथमिक शाळेतील 123 विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी गेल्या काही दिवसांपासून वर्गात जाणे बंद केले आहे.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime: आग्रा जिल्ह्यातील शमशाबाद ब्लॉकमधील सरकारी प्राथमिक शाळेतील 123 विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी गेल्या काही दिवसांपासून वर्गात जाणे बंद केले आहे.

दरम्यान, शुक्रवारी त्यांच्यापैकी काही जण त्यांच्या पालकांसह त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी शाळेऐवजी थेट जिल्हा न्यायालयात पोहोचले.

इयत्ता 6-8 मधील किमान 35 विद्यार्थ्यांनी असा दावा केला आहे की, 'त्यांचे शिक्षक त्यांचा विनयभंग आणि शारीरिक शोषण करायचे.' शिक्षकाला अटक झाल्यानंतरच आपण शाळेत परत येणार, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले.

दुसरीकडे, न्यायालयात जबाब नोंदवलेल्या पाच मुलींनी गेल्या दोन वर्षांत शिक्षकाकडून विनयभंग केल्याचा आरोप केला आहे.

सहायक शिक्षक, आशुतोष शर्मा (49) यांच्याविरुद्ध शमशाबाद पोलीस ठाण्यात पॉक्सो कायदा आणि आयपीसी कलम 323, कलम 35 (विनयभंग करण्याच्या उद्देशाने महिलेला जबरदस्ती करणे) आणि 506 (धमकावणे) या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

16 मे रोजी विद्यार्थ्यांच्या (Students) पालकांसह बाल हक्क कार्यकर्ते नरेश पारस यांनी पोलिस आयुक्त प्रीतींदर सिंग यांना या प्रकरणाची माहिती दिली.

त्यानंतर, शिक्षण विभागाने या शिक्षकाला निलंबित केले. सध्या हे शिक्षक महाशय फरार आहेत. शाळेत तैनात असलेल्या एका महिला शिक्षिकेने सांगितले की, "आम्ही पोलिस आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे औपचारिक तक्रार केली होती.

परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. तो उघड्यावर लघवी करायचा आणि मुलांना घाबरवण्यासाठी रिव्हॉल्व्हर घेऊन जायचा."

फतेहाबादाचे एसीपी सौरभ सिंह म्हणाले की, "एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे. सीआरपीसी 164 अंतर्गत न्यायदंडाधिकार्‍यांनी मुलांचे जबाब नोंदवले आहेत. चौकशी सुरु आहे. आरोपी शिक्षकाला लवकरच अटक केली जाईल."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Microsoft Exit Package: मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय! डिसेंबरपर्यंत स्वतःहून नोकरी सोडा; 60,000 कर्मचाऱ्यांना दिली ऑफर, टेक जगतात खळबळ

Goa Government: ‘बॉस’ बनलेल्‍या शिपायांना तत्‍काळ वठणीवर आणा! सरकारी खात्यांमधील 'बॉसगिरी'वर मुख्यमंत्री सावंत आक्रमक; खातेप्रमुखांना दिला कडक इशारा

Goa Cyber Fraud: 28 हजार कोटींच्या सायबर जाळ्याचा ‘फिक्सर’ गजाआड! गोव्यातील दाम्पत्याला 2.6 कोटींचा गंडा; मुंबईतील वकिलाला ईडी कोठडी

Goa Assembly Election 2027: गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ॲक्शन मोडमध्ये! नितीन नवीन यांच्या अध्यक्षतेखाली 'महा बैठक'; विजयाचा ठरणार रोडमॅप

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Controversy: वास्कोतील शिवपुतळा हटवण्याचा अंतरिम आदेश कायम, उच्च न्यायालयाकडून अर्जदारांची याचिका नामंजूर; ठोठावला 4 लाखांचा दंड!

SCROLL FOR NEXT