Mohammed Siraj & Prasidh Krishna Dainik Gomantak
देश

ICC Rankings: भारतीय गोलंदाजांचा बोलबाला! आयसीसीच्या ताज्या रँकिंगमध्ये सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाची मोठी झेप

ICC Test Rankings: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका अखेरच्या सामन्यातील भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर संपली.

Manish Jadhav

ICC Test Rankings: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका अखेरच्या सामन्यातील भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर संपली. या रोमांचक सामन्यातील विजयाचे खरे शिल्पकार ठरले ते दोन युवा गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna). त्यांच्या जबरदस्त गोलंदाजीमुळेच भारताने जवळपास हातातून गेलेला सामना पुन्हा जिंकला. या दमदार कामगिरीचे बक्षीसही या दोन्ही गोलंदाजांना आता आयसीसीच्या ताज्या टेस्ट रँकिंगमध्ये (ICC Test Ranking) मिळाले, ज्यात त्यांनी मोठी झेप घेतली.

बुमराह अव्वल स्थानी कायम

इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर आयसीसीने नवीन रँकिंग जाहीर केली. यामध्ये अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) अजूनही जगातील नंबर एकचा कसोटी गोलंदाज म्हणून कायम आहे. बुमराहने अखेरचा सामना खेळला नसला तरी, त्याचे अव्वल स्थान कायम आहे. त्याची सध्याची रेटिंग 889 इतकी आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या क्रमांकावरील गोलंदाज कगिसो रबाडा (Kagiso Rabada) याच्या रेटिंगमध्ये (851) आणि बुमराहच्या रेटिंगमध्ये चांगलेच अंतर आहे, त्यामुळे त्याचे पहिले स्थान सध्या तरी सुरक्षित आहे.

मोहम्मद सिराजची मोठी झेप

मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाबद्दल बोलायचे झाल्यास, ओव्हल कसोटीत सिराजने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या सामन्यात त्याने एकूण 9 विकेट्स घेतल्या. याच कामगिरीमुळे त्याचे रेटिंग वाढून 674 एवढे झाले. या वाढलेल्या रेटिंगमुळे सिराजने एकाच वेळी 12 अंकाची मोठी झेप घेतली. तो आता थेट 15व्या स्थानी पोहोचला. आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये 15व्या क्रमांकावर पोहोचण्याची ही सिराजची पहिलीच वेळ असून, ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम (all-time high) रँकिंग आहे.

प्रसिद्ध कृष्णाही आघाडीवर

प्रसिद्ध कृष्णासाठी ही मालिका सुरुवातीला काही खास ठरली नाही. त्याने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खूप धावा दिल्या, पण अखेरच्या कसोटी सामन्यात तो खरा हिरो ठरला. त्याच्या याच कामगिरीमुळे त्याची रेटिंग वाढून 368 झाले. कृष्णाने या रँकिंगमध्ये तब्बल 25 अंकाची मोठी झेप घेतली. तो आता थेट 59व्या स्थानी पोहोचला. ही प्रसिद्ध कृष्णाचीही आजवरची सर्वोत्तम रँकिंग आहे. या दोघांच्या कामगिरीमुळे भारतीय संघाची गोलंदाजी फळी अधिक मजबूत झाली. मालिका जरी संपली असली तरी, पुढील सामन्यांमध्ये या दोन्ही युवा गोलंदाजांची कामगिरी कशी राहते, हे पाहणे नक्कीच उत्सुकतेचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: पंधरा वर्षे पूर्ण झालेल्‍या 28,110 वाहनांचे नूतनीकरण! वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांची माहिती

Goa Assembly Live: "जर सनबर्न झाला नाही तर दुसरा कोणीतरी येईल" पर्यटन मंत्री

Astrology Gifts: भेट देताना रास बघा! ज्योतिषशास्त्रानुसार 'या' वस्तू ठरतील बहिणीसाठी शुभ

Goa Politics: खरी कुजबुज; अन्‍यथा विजय पत्रकार झाले असते!

Mahadevi Elephant: कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश! 'महादेवी' नांदणी मठात परतणार; मठ, वनतारा, शासन यांची एकत्रित याचिका

SCROLL FOR NEXT