ICC Test Rankings: आयसीसी कसोटी क्रमवारीत जो रुट पुन्हा नंबर वन; ब्रूकची घसरण, भारतीय फलंदाजांनाही फटका!

Joe Root No.1 Test Batsman: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) ताज्या कसोटी क्रमवारीत इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुट पुन्हा एकदा नंबर वन फलंदाज बनला आहे.
Joe Root No.1 Test Batsman
Joe Root Dainik Gomantak
Published on
Updated on

Joe Root No.1 Test Batsman: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) ताज्या कसोटी क्रमवारीत इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुट पुन्हा एकदा नंबर वन फलंदाज बनला आहे. त्याने आपलाच संघ सहकारी हॅरी ब्रूकला मागे टाकत हे स्थान पटकावले आहे. गेल्या आठवड्यातच नंबर वन बनलेल्या हॅरी ब्रूकची आता थेट तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. ताज्या क्रमवारीत भारतीय फलंदाजांचीही फारशी चांगली स्थिती नाही.

जो रुटने कशी खेचली बादशाही?

जो रुटच्या (Joe Root) क्रमवारीत झालेली ही वाढ भारतविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीतील त्याच्या दमदार कामगिरीचा परिणाम आहे. लॉर्ड्स कसोटीत जो रुटने दोन्ही डावांमध्ये मिळून 144 धावा केल्या. यात पहिल्या डावात त्याने तूफानी शतक ठोकले, तर दुसऱ्या डावात तो 40 धावांवर बाद झाला. याउलट, लॉर्ड्स कसोटीत हॅरी ब्रूकची बॅट शांत राहिली. त्याने दोन्ही डावांमध्ये मिळून केवळ 34 धावा (पहिल्या डावात 11, दुसऱ्या डावात 23) केल्या. यामुळेच त्याच्या क्रमवारीत मोठी घसरण झाली.

Joe Root No.1 Test Batsman
ICC Test Rankings: आयसीसी रँकिंगमध्ये पुन्हा उलटफेर, पंत-जयस्वालची चांदी; ट्रॅव्हिस हेडनेही घेतली मोठी झेप

क्रमवारीत कोण कुठे?

जो रुट 888 रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा फलंदाज केन विल्यमसन 867 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात नंबर वन असलेल्या हॅरी ब्रूकची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली असून त्याचे 862 रेटिंग गुण आहेत.

Joe Root No.1 Test Batsman
ICC Test Rankings: ऋषभ पंतने रचला इतिहास, कॅप्टन कूलही अशी कामगिरी करु शकला नाही

भारतीय फलंदाजांची निराशाजनक स्थिती

ICC च्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारतीय फलंदाजांची स्थिती फारशी चांगली नाही. यशस्वी जयस्वाल टॉप 5 मधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. त्याला स्टीव्ह स्मिथने मागे टाकून चौथे स्थान पटकावले आहे, त्यामुळे जयस्वाल आता 5 व्या स्थानावर आहे. शुभमन गिल तीन स्थानांनी घसरुन नवव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्यावर टॉप 10 मधून बाहेर जाण्याचे संकट आहे. ऋषभ पंतलाही एका स्थानाचे नुकसान झाले असून तो आता 7 व्या वरुन 8 व्या स्थानावर पोहोचला आहे. एकंदरीत, लॉर्ड्स कसोटीतील कामगिरीचा परिणाम खेळाडूंच्या क्रमवारीत स्पष्टपणे दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com