Mohammad Azharuddin Telangana Minister
माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन मंत्री झाले आहेत. त्यांना तेलंगणाच्या रेवंत रेड्डी सरकारच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले आहे. आज शुक्रवारी (३१ ऑक्टोबर ) राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मोहम्मद अझरुद्दीन यांना गोपनीयतेची शपथ दिली.
अझरुद्दीन यांच्या नियुक्तीसह, तेलंगणा सरकारमध्ये आता १६ मंत्री आहेत. मोहम्मद अझरुद्दीन हे तेलंगणा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष देखील आहेत आणि राज्यपालांच्या कोट्यातून तेलंगणा विधान परिषदेवर निवडून आले होते आणि आता त्यांना मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव
तेलंगणामध्ये २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा एकही मुस्लिम समाजातील उमेदवार जिंकला नाही. मोहम्मद अझरुद्दीन यांनाही निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला. म्हणूनच, तेलंगणामध्ये मुस्लिम समुदायाला प्रतिनिधित्व देण्यासाठी अझरुद्दीन यांची विधानपरिषद आणि मंत्रिमंडळात नियुक्ती करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
हैदराबादमधील ज्युबिली हिल्स विधानसभा मतदारसंघासाठीही पोटनिवडणूक होणार आहे, जिथे ३०% मतदार मुस्लिम समाजातील आहेत. मोहम्मद अझरुद्दीन यांच्या कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्तीला विरोधक विरोध करत होते.
जुबली हिल्समधील आगामी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहम्मद अझरुद्दीन यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्याचा रेवंत रेड्डी यांचा निर्णय घेतल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तथापि, विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आणि मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले.
जुबली हिल्स विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक ११ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या तारखेपूर्वी मोहम्मद अझरुद्दीन यांना कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्त करण्याची प्रक्रिया आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करते असा आरोप भाजपने केला आहे.
मोहम्मद अझरुद्दीन यांची कारकिर्द
मोहम्मद अझरुद्दीन हे माजी भारतीय क्रिकेटपटू, टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि राजकारणी आहेत. तेलंगणातील हैदराबाद येथे जन्मलेल्या या माजी क्रिकेटपटूने १९८४ मध्ये क्रिकेट जगात प्रवेश केला आणि १९९० ते १९९९ पर्यंत भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. १९८४ मध्ये पदार्पण केल्यानंतर त्यांनी २००० पर्यंत ९९ कसोटी सामने आणि ३३४ एकदिवसीय सामने खेळले.
२००० मध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणात सहभागी झाल्यानंतर बीसीसीआयने त्यांच्यावर आजीवन बंदी घातली. २०१२ मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने ही बंदी उठवली. तथापि, ते क्रिकेटमध्ये परतले नाहीत. त्याऐवजी, २००९ मध्ये, ते काँग्रेस पक्षात सामील झाले आणि उत्तर प्रदेशातील मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले.
२०१४ मध्ये त्यांनी त्याच जागेवरून खासदार म्हणूनही काम पाहिले. मोहम्मद अझरुद्दीन यांची हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (एचसीए) चे अध्यक्ष म्हणूनही नियुक्ती करण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.