अर्ध्या तासाहून अधिक वाट पाहिली, रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने 46 वर्षीय वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू; म्हापशातील धक्कादायक घटना

Mapusa Ambulance Delay: म्हापसा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने तब्बल 30 मिनिटांपेक्षा अधिक विलंबाचा फटका एका व्यक्तीला बसला.
Khorlim-Mapusa Tragedy
Mapusa Ambulance DelayDainik Gomantak
Published on
Updated on

Khorlim-Mapusa Tragedy: म्हापसा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने तब्बल 30 मिनिटांपेक्षा अधिक विलंबाचा फटका एका व्यक्तीला बसला आणि त्यात त्याचा जीव गेला. असागाव येथील रहिवासी असलेले आणि वीज विभाग कार्यरत असलेले 46 वर्षीय दिनेश कोरगावकर यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरगावकर यांना खोर्ली-म्हापसा (Khorlim-Mapusa) येथील एका ठिकाणी कामाच्या ब्रेकदरम्यान अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी तात्काळ जवळच्या एका घरात मदत मागितली. तेथील नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लगेचच आपत्कालीन सेवांना संपर्क साधला, पण अर्ध्या तासाहून अधिक काळ होऊनही रुग्णवाहिका (Ambulance) घटनास्थळी पोहोचली नाही.

Khorlim-Mapusa Tragedy
Mapusa Theft: बंगल्यात घुसून सशस्त्र दरोडा, 35 लाख लुटले! गोवा पोलिसांची पथके बंगाल, हैदराबाद, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मुंबईमध्ये दाखल

कोणताही पर्याय न राहिल्याने अखेरीस स्थानिक नागरिकांनी कोरगावकर यांना खाजगी वाहनाने म्हापसा जिल्हा रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. ते रुग्णालयाच्या (Hospital) अर्ध्या रस्त्यात असताना, अचानक पणजीजवळील पर्वरी येथून एक रुग्णवाहिका तिथे पोहोचली.

रस्त्यातच कोरगावकर यांना खाजगी वाहनातून त्या रुग्णवाहिकेत हलवण्यात आले आणि त्यांना त्वरीत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांची नाडी (Pulse) थांबली असल्याचे आढळले आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले.

Khorlim-Mapusa Tragedy
Mapusa Bad Roads: ‘रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांत रस्ते?’ म्‍हापशात रस्‍त्‍यांना तळ्‍याचे स्‍वरूप; अर्धवट केबलिंगचा फटका

रुग्णवाहिका सेवेतील या गंभीर विलंबाबद्दल स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या जीवघेण्या चुकीसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांनी केली. या घटनेने गोव्यातील आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीची कार्यक्षमता पुन्हा एकदा तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa town planning rule changes
Congo Ebola Epidemic Death Toll 2000
Nepalese Man Acquitted In POCSO Case
PM Narendra Modi Video Message
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com