Kuldeep Yadav Record: परदेशी मैदानांवर कुलदीपची 'जादू'! चहलला पछाडून बनला 'नंबर 1' भारतीय गोलंदाज; ऑस्ट्रेलियाविरुद्ध साधली किमया VIDEO

Ind vs Aus 2nd T20: कुलदीपने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी परदेशात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने स्टार अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहलला मागे सोडले.
Kuldeep Yadav Record
Kuldeep Yadav Dainik Gomantak
Published on
Updated on

India vs Australia 2nd T20I, Kuldeep Yadav: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला यजमान ऑस्ट्रेलियाकडून 4 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघ केवळ 125 धावांवर गुंडाळला गेला, ज्याचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने केवळ 13.2 षटकांत पूर्ण करुन मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

दरम्यान, या निराशाजनक पराभवातही भारताचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादव याने एका मोठ्या विक्रमाची नोंद केली. कुलदीपने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी परदेशात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने स्टार अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहलला मागे सोडले.

Kuldeep Yadav Record
AUS vs SA 2nd T20: दक्षिण आफ्रिकेची ऑस्ट्रेलियावर 'विराट' मात! मोडला आपलाच रेकॉर्ड; गोलंदाजांनी बजावली महत्त्वाची भूमिका

कुलदीप यादव बनला 'नंबर 1' गोलंदाज

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी करत कर्णधार मिचेल मार्श आणि जोश इंग्लिश यांना आऊट केले. या दोन विकेट्सच्या जोरावर कुलदीप आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी परदेशात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला. कुलदीपने आतापर्यंत परदेशात खेळलेल्या 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 11.2 च्या प्रभावी सरासरीने एकूण 39 विकेट्स घेतल्या. त्याने युजवेंद्र चहलचा विक्रम मोडला. चहलने परदेशात खेळलेल्या 32 सामन्यांमध्ये 27.62 च्या सरासरीने 37 विकेट्स घेतल्या होत्या. या यादीत कुलदीपने आता पहिले स्थान मिळवले, तर चहलची दुसऱ्या स्थानी घसरण झाली.

Kuldeep Yadav Record
Ind vs Aus 2nd ODI: 17 वर्षानंतर Adelaide मध्ये हरली टीम इंडिया! 2-0 ने मालिका ऑस्ट्रेलियाच्या खिशात

भारताचा दारुण पराभव

या सामन्यात भारताचा पराभव खूप मोठा होता. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाचा डाव गडगडला आणि संघ 18.4 षटकांत केवळ 125 धावांवर बाद झाला. भारताकडून युवा फलंदाज अभिषेक शर्मा याने एकट्याने झुंज दिली. त्याने 37 चेंडूंत सर्वाधिक 68 धावा केल्या. हर्षित राणाने 33 चेंडूंत 35 धावा केल्या, मात्र उर्वरित 9 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. 126 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने केवळ 13.2 षटकांत 6 गडी गमावून हे लक्ष्य सहज गाठले आणि 4 विकेट्सनी विजय मिळवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com