Goa Homestay Scheme: गोवा सरकारचे मोठे पाऊल! गावागावांत फुलणार पर्यटन; ‘होमस्‍टे आणि बेड व ब्रेकफास्‍ट’ योजना; संपूर्ण माहिती जाणून घ्या..

Rural tourism in Goa: योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्यांना सरकारकडून प्रत्‍येकी दोन लाखांचे अर्थसहाय्‍यही करण्‍यात येणार आहे. ही योजना पुढील पाच वर्षांसाठी असणार आहे.
Chandor Village Goa, Lost Legend of Chandor- A Treasure Hunt
Chandor Village GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ग्रामीण पर्यटनाला अधिकाधिक चालना देऊन ग्रामीण भागांतील जनतेला आर्थिक लाभ मिळवून देण्‍याच्‍या अनुषंगाने पर्यटन खात्‍याने ‘होमस्‍टे आणि बेड व ब्रेकफास्‍ट’ ही योजना चालीस लावली आहे. योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्यांना सरकारकडून प्रत्‍येकी दोन लाखांचे अर्थसहाय्‍यही करण्‍यात येणार आहे. ही योजना पुढील पाच वर्षांसाठी असणार आहे. पर्यटन संचालक केदार नाईक यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली.

सदर योजनेअंतर्गत स्‍थानिकांना ग्रामीण भागांमध्‍ये किमान सहा खोल्‍यांचे आणि बारा बेड असलेले होमस्‍टे उभारता येणार आहे. तेथे पर्यटकांच्‍या उपहाराची व्‍यवस्‍था करता येईल. त्‍यासाठी संबंधित व्‍यक्तीकडे पंधरा वर्षांचा रहिवाशी दाखला असणे आणि तो ज्‍या ठिकाणी होमस्‍टे सुरू करणार आहे, ती जागा त्‍याच्‍या मालकीची असणे अनिवार्य आहे.

अशा व्‍यक्तींनी योजनेचा लाभ घेण्‍यासाठी प्रथम पर्यटन खात्‍याकडे नोंदणी करावी लागेल. त्‍यानंतर त्‍याला खात्‍याकडे अर्ज सादर करावा लागेल. त्‍यानुसार खात्‍याचे अधिकारी संबंधित जागा आणि व्‍यवस्‍थेची पाहणी करून अर्जांना मान्‍यता देतील, असे नाईक यांनी अधिसूचनेत म्‍हटले आहे.

‘होमस्‍टे, बेड ॲण्‍ड ब्रेकफास्‍ट’ सुरू करण्‍यास इच्‍छुक असलेल्‍या उत्तर गोव्‍यातील नागरिकांनी पणजीतील पर्यटन भवनात तर दक्षिण गोव्‍यातील नागरिकांनी दक्षिण विभाग कार्यालय, मडगाव येथे अर्ज सादर करावे, असे आवाहनही खात्‍याने केले आहे.

दरम्‍यान, पर्यटनाचा स्‍वर्ग असलेल्‍या गोव्‍याला दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक भेट देत असतात. परंतु, बहुतांशी पर्यटक केवळ समुद्रकिनाऱ्यांचाच लाभ घेत असतात.

अशा पर्यटकांना ग्रामीण भागांकडे वळवणे, त्‍यांना तेथील पर्यटनाचा आस्‍वाद देण्‍यासाठी तसेच त्‍यांच्‍या माध्‍यमातून ग्रामीण गोव्‍याची अर्थव्‍यवस्‍था बळकट करण्‍यासाठी विविध उपाययोजना राबवत आहे. त्‍याचाच भाग म्‍हणून पर्यटन खात्‍याने ‘होमस्‍टे, बेड ॲण्‍ड ब्रेकफास्‍ट’ ही योजना चालीस लावली आहे.

योजनेची वैशिष्ट्ये

नाव : होमस्टे, बेड ॲण्‍ड ब्रेकफास्ट. कालावधी : ५ वर्षे. अर्थसाहाय्य : प्रत्‍येकी २ लाख.

पात्रता : १५ वर्षांचा रहिवासी दाखला. स्वतःच्या मालकीची जागा. किमान ६ खोल्या आणि १२ बेड.

उद्देश : ग्रामीण पर्यटनाचा विकास व स्थानिकांना रोजगार

Chandor Village Goa, Lost Legend of Chandor- A Treasure Hunt
Konkan Tourism: निसर्गरम्यता आणि ऐतिहासिक वारसा... जांभ्या दगडात विना-चुना बांधलेला बळकट 'रामगड'

योजनेचे संभाव्य फायदे

ग्रामीण भागातील महिलांना व युवकांना रोजगाराच्या संधी

स्थानिक संस्‍कृती, पाककृती, हस्तकलेला बाजारपेठ

शाश्वत पर्यटनाची संकल्पना होणार बळकट

पर्यटकांना किनाऱ्यांव्यतिरिक्त नव्या ठिकाणांचा अनुभव

Chandor Village Goa, Lost Legend of Chandor- A Treasure Hunt
Goa Tourism: 500 वर्षांपूर्वीचे दगड, पोर्तुगीज कालीन किल्ला, गर्दीपासून दूर 'या' गावाने जपलेय 'पारंपरिक पर्यटन'

अर्ज कोठे सादर करायचे?

उत्तर गोवा : पर्यटन भवन, पणजी

दक्षिण गोवा : पर्यटन विभाग कार्यालय, मडगाव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com