Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
देश

Prime Minister Narendra Modi: PM मोदींच्या भाषणात 'मोदी-अदानी भाई-भाई' च्या घोषणा; पंतप्रधान म्हणाले...

Prime Minister Narendra Modi Speech: गौतम अदानी प्रकरणी जेपीसी चौकशीची मागणी करत विरोधी खासदारांनी सभागृहात पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान अनेक घोषणा दिल्या.

Manish Jadhav

Prime Minister Narendra Modi: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर राज्यसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी गोंधळ घातला. गौतम अदानी प्रकरणी जेपीसी चौकशीची मागणी करत विरोधी खासदारांनी सभागृहात पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान अनेक घोषणा दिल्या.

दरम्यान, गुरुवारी दुपारी पंतप्रधान मोदींचे भाषण सुरु होताच काँग्रेससह विरोधी पक्षांच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. सभागृहात 'मोदी-अदानी भाई-भाई'च्या घोषणा देण्यात आल्या. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विरोधी खासदारांना टोला लगावला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'कमळ हे चिखलातच फुलते.'

पीएम मोदींच्या भाषणादरम्यान विरोधी खासदारांनी दिलेल्या घोषणांपैकी एक म्हणजे "अदानींवर बोला, काहीतरी बोला". याशिवाय अदानींवर उत्तर द्या, 'जवाब दो' च्या घोषणाही देण्यात आल्या. विरोधी पक्षांच्या खासदारांमध्ये काँग्रेस (Congress), आम आदमी पार्टीसह अनेक पक्षांच्या नेत्यांचा समावेश होता.

दुसरीकडे, विरोधकांच्या घोषणाबाजीवर पीएम मोदी म्हणाले की, ''अशा घोषणा देणाऱ्या सदस्यांना मी हेच म्हणेन...तुम्ही जितका चिखल टाकाल, तितके कमळ फुलेल.” विरोधी पक्षांवर टीका करताना मोदी म्हणाले की, 'कमळ फुलवण्यात त्यांचाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारही आहे.'

संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आक्रमक होते

गेल्या महिन्यात हिंडेनबर्ग या अमेरिकन फर्मने उद्योगपती गौतम अदानी संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला, त्यानंतर अदानी समूहाच्या (Adani Group) शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. हिंडेनबर्ग यांनी आपल्या अहवालात अदानी समूहावर हेराफेरी आणि फसवणुकीचे गंभीर आरोप केले. मात्र, अदानी समूहाने हे आरोप फेटाळून लावले.

दुसरीकडे, अहवालाच्या परिणामामुळे गौतम अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावरुन खाली घसरले.

त्याचवेळी, संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनात अदानी प्रकरणावरुन बराच गदारोळ झाला. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही गौतम अदानींचे नाव घेत सरकावर निशाणा साधला. ते म्हणाले की, '2014 मध्ये गौतम अदानी यांचे रँकिंग 609 व्या क्रमांकावर होते, जे काही वर्षांत ते दुसऱ्या क्रमांकावर आले.' विरोधी पक्षांनी या प्रकरणाची जेपीसी चौकशीची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! अजित पवारांच्या विमान अपघाताचं CCTV फुटेज आलं समोर; क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं VIDEO

Ajit Pawar: "दादा परत या"! उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या समर्थकांना अश्रू अनावर; बारामती दुःखात हरवली Watch Video

Antonio Costa: ''माझ्‍या कुटुंबाची मुळे गोव्यात'', युरोपच्या सर्वोच्च नेत्याचा 'गोमंतकीय' बाणा; CM सावंतांचं खास ट्विट VIDEO

Ajit Pawar Passed Away: "महाराष्ट्रानं कर्तबगार नेतृत्व गमावलं!" अजित पवारांच्या निधनावर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह दामू नाईक, युरींनी वाहिली श्रद्धांजली

Goa Farming: शेती क्षेत्रातून महत्वाची माहिती! गोव्यात खरीप हंगामातील भाजीपाला लागवड घटली; आकडेवारी उघड

SCROLL FOR NEXT