Gautam Adani In Aap ki Adalat: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी अनेकदा अदानी समूहाला घेरण्याचा प्रयत्न करतात. या प्रकरणी गौतम अदानी पहिल्यांदाच उघडपणे बोलले आहेत. एका टीव्ही मुलाखतीदरम्यान याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, 'त्यांच्या हल्ल्यांचा मला खूप फायदा झाला.' गौतम अदानी म्हणाले की, '2014 च्या निवडणुकीदरम्यान आणि त्यानंतर राहुलजींनी माझ्यावर केलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे लोकांना मला जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळाली. यामुळे मी आज येथे आहे.'
दरम्यान, इंडिया टीव्हीच्या 'आप की अदालत' या कार्यक्रमात गौतम अदानी यांनी अनेक मुद्द्यांवर खुलेपणाने भाष्य केले. काँग्रेस (Congress) आणि राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याचा काही फायदा आपल्याला होतो का, असा प्रश्न अदानी यांना विचारण्यात आला असता त्यांनी ते साफ फेटाळून लावले. अदानी म्हणाले की, पंतप्रधान मोदींकडून कोणीही वैयक्तिक फायदा घेऊ शकत नाही.
मुलाखतीत राहुल गांधींबद्दल (Rahul Gandhi) विचारण्यात आलेल्या प्रश्नावर गौतम अदानी म्हणाले की, 'राहुलजींबद्दल वारंवार बोलून तुम्ही राहुलजींशी भांडण लावाल आणि ते उद्या दुसरे वक्तव्य करतील. राहुलजी बडे नेते आहेत. त्यांना राजकीय पक्षही चालवावा लागतो. त्यांच्या विचारसरणीची लढाई आहे. त्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मी एक सामान्य व्यापारी आहे. मी माझे काम करतो आणि ते आपल्या अटींवर राजकारण करतात.'
त्याचवेळी पीएम मोदींबाबत अदानी म्हणाले की, 'मला माझ्या आयुष्यात तीन मोठे ब्रेक मिळाले. प्रथम, 1985 मध्ये राजीव गांधींच्या कारकिर्दीत, जेव्हा एक्झिम पॉलिसीने आमच्या कंपनीला जागतिक व्यापार गृह बनण्याची परवानगी दिली. दुसरे 1991 मध्ये जेव्हा पी.व्ही. नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्था खुली केली आणि आम्ही सार्वजनिक-खाजगी भागीदारी मोडमध्ये प्रवेश केला.'
अदानी पुढे म्हणाले की, 'नरेंद्र मोदींच्या 12 वर्षांच्या प्रदीर्घ राजवटीत गुजरातमध्ये मला तिसरा ब्रेक मिळाला, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मी अभिमानाने सांगू शकतो की, हा एक चांगला अनुभव होता. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मोदीजींकडून तुम्हाला कधीही वैयक्तिक मदत मिळू शकत नाही. राष्ट्रहिताच्या धोरणांबद्दल तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, पण जेव्हा धोरण बनते तेव्हा ते सर्वांसाठी असते, फक्त अदानी समूहासाठी नाही.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.