Mob Attempt to burn Biren Singh's house in Manipur. Dainik Gomantak
देश

Manipur Violence: मणिपूर हिंसाचाराची आग मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत, एन बीरेन सिंग यांचे घर जाळण्याचा प्रयत्न

N Biren Singh: गुरुवारी रात्री मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग यांच्या घरावर जमावाने हल्ला केला. मात्र, याठिकाणी आधीच कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुरक्षा दलांनी हवेत गोळीबार करून जमावाला कसेबसे रोखले.

Ashutosh Masgaunde

Mob Attempt to burn N Biren Singh's house in Manipur: मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर झाली आहे. मेईती समाजातील दोन बेपत्ता विद्यार्थ्यांच्या हत्येनंतर राज्यात पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. गुरुवारी संतप्त आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये अनेक ठिकाणी चकमक झाली.

दरम्यान, संतप्त जमावाने इंफाळमधील मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानावर हल्ला करत ते जाळण्याचा प्रयत्न केला.

गुरुवारी, मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानाकडे मोर्चा काढण्यासाठी इंफाळ पूर्वेतील हँगिंग भागात मोठ्या संख्येने आंदोलक जमले. मात्र सुरक्षा दलांनी त्यांना वेळेवर रोखले.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, इंफाळमधील हँगिंग येथील मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सुरक्षा दलांनी आंदोलकांना निवासस्थानापूर्वी सुमारे 100 मीटर अंतरावर रोखले.

मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांचे वडिलोपार्जित घर राज्याची राजधानी इंफाळच्या बाहेरील भागात आहे. हे घर रिकामे आहे. गुरुवारी रात्री जमावाने घरावर हल्ला केला.

मात्र, याठिकाणी आधीच कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुरक्षा दलांनी हवेत गोळीबार करून जमावाला कसेबसे रोखले.

पोलिसांनी सांगितले की, मुख्यमंत्री अत्यंत सुरक्षित घरात राहतात. इंफाळमधील हिंगांग भागात मुख्यमंत्र्यांच्या वडिलोपार्जित घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरक्षा दलांनी जमावाला घरापासून सुमारे 100-150 मीटर अंतरावर रोखले. घरात कोणी राहत नसले तरी तेथे चोवीस तास पहारा असतो.

एन बीरेन सिंग यांचे रिकामे वडिलोपार्जित घर जमावापासून वाचवण्यासाठी जलद कृती दल आणि राज्य पोलिसांनी जबाबदारी घेतली.

हवाई गोळीबार केला आणि अश्रुधुराच्या अनेक गोळ्या झाडल्या. संतप्त आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळले. अनेक ठिकाणी तोडफोड झाली आहे.

या घटनेच्या एक दिवस आधी थौबल जिल्ह्यातही हिंसक निदर्शने झाली होती. त्यादरम्यान आंदोलक गटाने भाजप कार्यालय गाठून गेट तोडले. यानंतर त्यांनी खिडक्यांच्या काचा फोडून ते पेटवून दिले.

मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू झाल्यापासून भाजपच्या कार्यालयावर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी जून महिन्यात थोबाल जिल्ह्यातील भाजपच्या तीन कार्यालयांची तोडफोड करण्यात आली होती. यावेळी जमावाने कार्यालयाचे गेट, खिडक्या आणि आवारात उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडल्या होत्या.

बेपत्ता विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे प्रकरण

६ जुलैला बेपत्ता झालेल्या दोन विद्यार्थ्यांची हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर स्थानिक लोकांनी निदर्शने केली. दरम्यान, मंगळवारी रात्री स्थानिक आंदोलक आणि आरएएफ सुरक्षा जवानांमध्ये चकमक झाली.

जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या घटनेत ४५ जण जखमी झाले असून यातील बहुतांश विद्यार्थी आहेत.

दोन्ही विद्यार्थ्यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सीबीआयचे संचालक अजय भटनागर बुधवारी आपल्या टीमसह इम्फाळला पोहोचले. मुख्यमंत्री एन बीरेन सिंग या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सतत संपर्कात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीयांसाठी खास पर्वणी! प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्तींचा गोवा दौरा, वाचा सविस्तर माहिती

Margao: '..पुन्हा परीक्षा घ्या, अन्यथा नगरपालिकेचे काम रोखू'! मडगाव कर्मचारी भरती परीक्षेवरुन काँग्रेस, NSUI आक्रमक

Goa Coconut Price: गोमंतकीयांना दिलासा! नारळ, भाज्यांचे दर उतरले; 'फलोत्पादन'ने विकले 1 लाख नारळ

"हांव खरें तेंच उलायला", एका शब्दाने उडाला गोंधळ; तरीही मंत्री कामत शब्दावर 'ठाम'

Goa Census: गोव्यात 2 टप्प्यांत होणार जनगणना! पूर्णपणे डिजिटल पद्धतीचा वापर; ॲपद्वारे होणार घरांची नोंद

SCROLL FOR NEXT