Mizoram ANI
देश

Mizoram: आसाम रायफल्सच्या पोलिसांची मोठी कारवाई! मिझोराममध्ये जप्त केले कोटींचे हिरॉइन

Mizoram: जप्त केलेले हेरॉईन चांफईच्या एक्साइज अँड नार्कोटिक्स डिपार्टमेंटला सोपवण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Mizoram: मणिपूर सध्या आंदोलने, हिंसा, अत्याचार आणि दोन गटातील संघर्ष यांमुळे मोठ्या चर्चेत आहे. आता मिझोराममध्ये 1.24 कोटीची हिरोईन जप्त केल्याने खळबळ निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आसाम रायफलच्या मिझोराम बटालियनमधील जनरल इंन्पेक्टर जनरलच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे. 1 ऑगस्टला झोटे, चांफई या परिसरात 1.24 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे हेरॉईनचा साठा जप्त केला आहे.

कायदेशीर कारवाईसाठी जप्त केलेले हेरॉईन चांफईच्या एक्साइज अँड नार्कोटिक्स डिपार्टमेंटला सोपवण्यात आले आहे.

दरम्यान, मणिपूरमध्ये कुकी आणि मताई या दोन गटांमध्ये हिंसक पद्धतीने संघर्ष सुरु असून काही दिवसांपूर्वीच महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.

मणिपूरमधील हिंसाचार आणि अत्याचाराचा परिणाम मिझोराममध्ये होऊ नये यासाठी मिझोरामच्या राज्य सरकारने मतैई समाजाला सुरक्षा पुरवली होती. आता मिळालेल्या ड्रग्जच्या साठ्यानंतर नार्कोटिक्स डिपार्टमेंट काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT