Earthquake in Andaman Islands: सलग दुसऱ्या दिवशी अंदमानात भूकंपाचे धक्के, रिश्ट स्केलवर 4.3 तीव्रता

अंदमान बेटावर सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे पुन्हा सौम्य धक्के जाणवले आहेत .
Earthquake in Andaman Islands
Earthquake in Andaman IslandsDainik Gomantak
Published on
Updated on

Earthquake in Andaman Islands: सलग दुसऱ्या दिवशी अंदमान बेटावर सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भुकंपाची तीव्रता रिश्ट स्केलवर 4.3 एवढी होती.

अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे. आत्तापर्यंत कोणतीही जीवीत किंवा वित्त हानी झाल्याची माहीती नाही.

दरम्यान, बुधवारी (2 जुलै) सकाळी 5:40 वाजता अंदमान बेटावर  भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भुकंपाची तीव्रता 5.0 एवढी होती.

तर यापुर्वी 29 जुलैला अंदमान आणि निकोबारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता 5.8 मॅग्नीट्युड रिश्टर स्केल इतकी दर्शवली होती.

रात्री 12.53 ला झालेला हा भूकंप पोर्ट ब्लेअर पासून दक्षिण पूर्वेला 126 किलोमीटर झाल्याची माहीती एनसीएसने ट्वीट करत दिली होती.

  • भूकंपाचे कारण काय?

पृथ्वी प्रामुख्याने चार थरांनी बनलेली आहे. आतील गाभा, बाह्य गाभा, आवरण आणि कवच. कवच आणि वरच्या आवरणाच्या गाभ्याला लिथोस्फीअर म्हणतात.

आता हा 50 किलोमीटर जाडीचा थर टेक्टोनिक प्लेट्स नावाच्या अनेक विभागांमध्ये विभागला गेला आहे. म्हणजेच पृथ्वीचा वरचा पृष्ठभाग 7 टेक्टोनिक प्लेट्सने बनलेला आहे.

या प्लेट्स कधीही स्थिर नसतात, त्या सतत फिरत राहतात, जेव्हा या प्लेट्स एकमेकांच्या दिशेने जातात तेव्हा त्या एकमेकांवर आदळतात.

काही वेळा या प्लेट्सही तुटतात. त्यांच्या धडकेमुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते, त्यामुळे परिसरात एकच धक्के जाणवतात.

कधी कधी हे धक्के खूप कमी तीव्रतेचे असतात त्यामुळे ते जाणवतही नाहीत. कधीकधी ते इतक्या तीव्रतेचे असतात की पृथ्वीचा स्फोट होतो.

  • भूकंप आल्यावर काय करावे आणि काय करू नये?

धक्के जाणवल्यास ताबडतोब जमिनीवर बसा आणि आपले डोके खाली टेकवा.

मजबूत टेबल किंवा फर्निचरच्या आवरणाखाली स्वतःचा बचाव करावा.

याशिवाय घरातील वडीलधाऱ्यांची आणि मुलांची विशेष काळजी घ्यावी. 

त्यांना प्रथम बचावाच्या पद्धती सांगून त्यांचे संरक्षण करा. 

जर भूकंपाचा धक्का खूप तीव्र असेल तर काळजीपूर्वक घरातून बाहेर पडा आणि मोकळ्या मैदानावर किंवा रस्त्यावर जावे. 

याशिवाय भूकंपाच्या वेळी काच, खिडकी, पंखा किंवा झुंबर इत्यादी जड आणि पडणाऱ्या वस्तूंपासून दूर राहा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com