MP assembly election 2023 mirchi baba shivraj singh chauhan. Dainik Gomantak
देश

मध्य प्रदेशच्या रणधुमाळीत Mirchi Babaची एन्ट्री, हायप्रोफाईल जागेवरून मुख्यमंत्री शिवराज यांना देणार टक्कर

Ashutosh Masgaunde

Mirchi Baba To Contest Against Chief Minister Shivraj Singh Chauhan In Madhya Pradesh Assembly Election 2023:

सीहोर जिल्ह्यातील बुधनी ही विधानसभेची हायप्रोफाईल जागा मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

कारण, आता या निवडणुकीच्या रणधुमाळीत मिर्ची बाबा उतरले आहेत. भाजपचे उमेदवार आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना टक्कर देण्यासाठी समाजवादी पक्षाने वादग्रस्त मिर्ची बाबांना तिकीट दिले आहे.

मिर्ची बाबा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्याचवेळी काँग्रेसने रामायण टीव्ही सीरियलमध्ये हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या विक्रम मस्ताल यांना शिवराज यांच्याविरोधात बुधनी विधानसभेतून तिकीट दिले आहे.

मिर्ची बाबा यांना गेल्या वर्षी एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती, त्यादरम्यान त्याला तुरुंगातही जावे लागले होते. त्यानंतर त्यांनी शिवराज सरकारवर निशाणा साधला होता.

यापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भोपाळमधील काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या विजयासाठी मिर्ची बाबा 5 क्विंटल मिरचीचा हवन करून प्रसिद्धीझोतात आले होते.

त्यावेळी त्यांनी असा दावा केला होता की, दिग्विजय सिंह निवडणूक जिंकले नाहीत तर ते स्वतः जलसमाधी करतील, पण दिग्विजय साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याकडून निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी आपला शब्द फिरवला.

सोमवारी मिर्ची बाबांनी लखनऊमध्ये सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली. यानंतर अखिलेश यांनी X (ट्विटरवर) एक फोटो शेअर केला होता. व लिहिले होते, 'एका खास जागेवरून निवडणूक लढवणार असल्याबद्दल आगाऊ शुभेच्छा.'

तेव्हापासून मिर्ची बाबा बुधनीमधून सपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, शुक्रवारी सपाच्या उमेदवारांची यादी समोर आल्यानंतर अधिकृतरीत्या पुष्टी झाली.

बुधनी ही मध्य प्रदेशातील विधानसभेची हायप्रोफाईल जागा मानली जाते, कारण मुख्यमंत्री शिवराज चौहान सलग 5 वेळा येथून निवडणूक जिंकत आले आहेत.

तर या जागेवर काँग्रेसने अभिनेता विक्रम मस्ताल यांना उमेदवारी दिली आहे. त्याचवेळी आता सपाने बुधनीमधून मिर्ची बाबांना तिकीट देऊन स्पर्धा आणखीनच रंजक केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT