National Institute of Pathology: देशभरातील प्रयोगशाळांचे जिओ मॅपिंग, आता रुग्णांना घरबसल्या मिळणार माहिती

Geo Mapping: तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, देशात दररोज 60 ते 70 टक्के रुग्णांवर प्रयोगशाळेतील चाचणी अहवालाच्या आधारे उपचार केले जातात. उर्वरित 30 ते 40 टक्के रुग्ण हे आपत्कालीन औषधांशी संबंधित आहेत.
National Institute of Pathology Geo Mapping India
National Institute of Pathology Geo Mapping IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

The work of Geo Mapping of testing laboratories across the country has started by National Institute of Pathology:

आता देशातील रुग्णांना त्यांच्या जवळच्या सरकारी आणि खासगी प्रयोगशाळांची माहिती घरी बसूनच मिळणार आहे.

देशभरातील चाचणी प्रयोगशाळांच्या Geo Mapping चे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि दिल्लीसह सहा राज्यांमध्ये याची सुरुवात झाली आहे.

यामध्ये हेमॅटोलॉजीपासून क्लिनिकल केमिस्ट्री आणि आण्विक चाचणीपर्यंतच्या प्रयोगशाळांचा समावेश आहे.

रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावेत यासाठी पुढाकार घेऊन भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) अंतर्गत राष्ट्रीय पॅथॉलॉजी संस्थेने एक टास्क फोर्स तयार केला आहे आणि www.icmrdisha.in ही वेबसाइटही तयार केली आहे.

National Institute of Pathology Geo Mapping India
जज साहेब, मला परदेशात जाऊ द्या... मुलीला वाचवण्यासाठी एका आईची हायकोर्टाकडे दाद

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पॅथॉलॉजीच्या संचालिका डॉ. उषा अग्रवाल सांगतात की, समाजाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी प्रत्येकाला स्थान आणि चाचण्यांची उपलब्धता उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे.

त्यांना ओळखण्यासाठी जीआयएस तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे. या अंतर्गत, प्रयोगशाळांची माहिती प्रदर्शित करण्यासाठी दिशा नावाची सर्वसमावेशक डायनॅमिक ऑनलाइन मॅप सेवा सुरू करण्यात आली आहे.

National Institute of Pathology Geo Mapping India
खेळण्यातील पिस्तूल, बनावट डायनामाइट बॉक्स आणि डॉक्टर; बँकेत रंगलं थरारनाट्य

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, देशात दररोज 60 ते 70 टक्के रुग्णांवर प्रयोगशाळेतील चाचणी अहवालाच्या आधारे उपचार केले जातात.

उर्वरित 30 ते 40 टक्के रुग्ण हे आपत्कालीन औषधांशी संबंधित आहेत. या आकडेवारीवरून लक्षात येते की रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी प्रयोगशाळेतील चाचणीची भूमिका किती महत्त्वाची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com