Girl Dainik Gomantak
देश

Smartphone: मोबाईलसाठी कायपण! 'अल्पवयीन मुलीला घ्यायचा होता फोन पण...',

Minor Girl: जगभरात मोबाईल चाहत्यांची संख्या इतकी वाढली आहे की लोक यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात.

दैनिक गोमन्तक

Girl To Buy Smartphone On Blood: जगभरात मोबाईल चाहत्यांची संख्या इतकी वाढली आहे की लोक यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. लहान मुलांनाही मोबाईलचे इतके वाईट व्यसन लागले आहे की ते काहीही करुन जातात. दरम्यान, पश्चिम बंगालमधून एका अल्पवयीन मुलीने स्मार्टफोनसाठी आपले ब्लड विकण्याचा निर्णय घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हॉस्पिटलच्या रक्तपेढीत पोहोचले

खरे तर हे प्रकरण पश्चिम बंगालमधील (West Bengal) आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी येथील दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील एक अल्पवयीन मुलगी तिचे ब्लड विकण्यासाठी बालूरघाट जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत पोहोचली. तिथे ती डॉक्टरांशी (Doctors) व्यवस्थित बोलली, त्यानंतर डॉक्टरांनी तिला हे का करायचे आहे, याचे कारण विचारले. यानंतर जेव्हा तिने संपूर्ण हकीकत सांगितली तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले.

हा किस्सा सांगितल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटले

वास्तविक, ती मुलगी स्वतःसाठी स्मार्टफोन घेण्याचा प्रयत्न करत होती, मात्र तिच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे तिने स्वतःचे ब्लड विकायचे ठरवले. मुलीने स्वत: सांगितले की, 'मी एका नातेवाईकाच्या फोनवरुन स्वत:साठी ऑनलाइन मोबाइल (Mobile) मागवला आहे. मात्र आता तो घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत.' मुलगी नाव बदलून तिच्या घरापासून 30 किमी अंतरावर असलेल्या बालूरघाटला पोहोचली होती.

दुसरीकडे, मुलीचे वडील स्थानिक बाजारात भाजी विकतात आणि आई गृहिणी असल्याचे सांगितले जात आहे. सध्या या घटनेनंतर रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांनी चाइल्डलाइनला ही माहिती दिली. यानंतर या मुलीचे समुपदेशन करुन तिला जिल्हा बाल कल्याण समितीमार्फत तिच्या पालकांकडे पाठविण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: कुटुंबांच्या भांडणात आणली तलवार! Video Viral झाल्यामुळे पोलिसांची तारांबळ; संबंधिताविरोधात गुन्हा नोंद

Pernem Theft: पेडण्यात दिवसाढवळ्या घरफोडी; 4.5 लाखांचा ऐवज लंपास, घर बंद असताना मारला डल्ला

P S Sreedharan Pillai: राजभवनाचे लोकभवनात रूपांतर करणारे 'पी. एस. श्रीधरन पिल्लई'

Goa Politics: भाजपशी काहींचे ‘जॉईंट व्‍हेंचर’! सरदेसाईंचा अमित पाटकरना टोला; भूरूपांतरणावरुन रंगला कलगी तुरा

Goa Taxi: 'टॅक्‍सी व्‍यवसायातील भोंगळ व्‍यवस्‍थेमुळे पर्यटकांमध्‍ये घट'! गुदिन्‍हो यांचा दावा; पारदर्शकतेसाठी ‘कॅब ॲग्रीगेटर’ धोरण

SCROLL FOR NEXT