Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: "लग्न लावून द्या, नाहीतर...!" विजेच्या तारेला लटकणाऱ्या प्रियकराचा थरार; सोशल मीडियावर 22 सेकंदाचा व्हिडिओ तुफान व्हायरल

Minor Boy Viral Video: आजच्या जमान्यात जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आहे. या तंत्रज्ञानाचे जेवढे फायदे आहेत, तेवढेच तोटेही आहेत.

Manish Jadhav

Minor Boy Viral Video: आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. या तंत्रज्ञानाचे जेवढे फायदे आहेत, तेवढेच तोटेही आहेत. आजकाल लोक कुठेही आणि कधीही व्हिडिओ बनवायला सुरुवात करतात. अनेकदा अशा ठिकाणी कॅमेरा चालू केला जातो, जिथे व्हिडिओ बनवणे चुकीचे असते, तर कधी कधी लोकांच्या अतरंगी हरकती किंवा विचित्र घटना कॅमेऱ्यात कैद होतात. अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात आणि नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. सध्या असाच एक हैराण करणारा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे, जो उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील असल्याचे सांगितले जात आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये जे काही दिसते ते पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. अवघ्या 22 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एक तरुण चक्क 'हाय-टेंशन' विद्युत तारेला लटकलेला दिसत आहे. विजेच्या धोकादायक तारांना अशा प्रकारे लटकणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखेच आहे. या तरुणाला असे जीवघेणे कृत्य करताना पाहून खाली लोकांची मोठी गर्दी जमा झाली होती. खाली उभे असलेले लोक त्याला वारंवार खाली उतरण्याची विनंती करत होते आणि ओरडत होते. हा तरुण खाली पडला असता किंवा त्याला विजेचा धक्का लागला असता, तर मोठी दुर्घटना घडली असती.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताना त्यासोबत धक्कादायक माहितीही देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण अल्पवयीन असून आपल्या प्रेयसीशी लग्न करण्याच्या मागणीसाठी त्याने हे टोकाचे पाऊल उचलले होते. 'घरच्यांनी प्रेयसीशी लग्न लावून द्यावे, अन्यथा मी जीव देईन' अशा जिद्दीने तो त्या उंच विजेच्या तारेवर जाऊन लटकला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तरुणाचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांनी एक शक्कल लढवली आणि त्याला लग्नाचे आश्वासन दिले. पोलिसांनी 'तुझे लग्न लावून देऊ' असे आमिष दाखवल्यानंतर तो तरुण खाली उतरायला तयार झाला.

'X' वर @gharkekalesh नावाच्या अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पोस्ट होताच काही वेळातच हजारो लोकांनी तो पाहिला असून त्यावर मजेशीर आणि संतप्त प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. एका युजरने गमतीने लिहिले की, "आता हा भाऊ थेट सासरी म्हणजेच पोलीस ठाण्यात जाईल आणि तिथे पोलीस त्याची 'खास' बडदास्त ठेवतील." तर काही लोकांनी अशा प्रकारे स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या तरुणावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रेमासाठी अशा प्रकारे वेडेपणा करणे किती महागात पडू शकते, याचेच हे उत्तम उदाहरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'सिलिंडर'ची चिंता सोडा; 'बायोगॅस'चा वापर करा! सरकारकडून मिळते अनुदान

VIDEO: आंध्र प्रदेशात काळाचा घाला! बस आणि ट्रकच्या धडकेनंतर भीषण आग; 8 प्रवासी जिवंत जळाले, 18 गंभीर जखमी

Mhavalinge Land Conversion: भू-रूपांतराला मुख्यमंत्र्यांचा ब्रेक, म्हावळिंगेत दरीचा भाग असल्याने हंगामी मंजुरीही रद्द

Goa Politics: खरी कुजबुज; भाजपचा मोठा जोर!

6,72,646 प्रॉपर्टी कार्डांचे वितरण, केंद्र सरकारच्‍या 'स्‍वामित्‍व' योजनेअंतर्गत 410 गावांतील घरांसह जमिनींचे ड्रोनद्वारे झाले मोजमाप

SCROLL FOR NEXT