Rahul Gandhi Bike Ride At Ladakh Dainik Gomantak
देश

मोदींच्या मंत्र्यांनी मानले चक्क राहुल गांधींचे आभार; लडाखमध्ये बाईक रायडिंगवरून तापले राजकारण...

काय म्हणाले किरेन रिजिजू, प्रल्हाद जोशी वाचा...

Akshay Nirmale

Central Ministers on Rahul Gandhi Bike Ride at Ladakh: जम्मू-काश्मीरमधून कलम 370 आणि 35 अ हटवल्यानंतर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी पहिल्यांदाच लडाखला पोहोचले. राहुल यांनी लडाखच्या रस्त्यांवर बाइक रायडिंगचा आनंदही घेतला. शनिवारी राहुल यांचे बाईक रायडिंगचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

त्यांची ही छबी, प्रतिमा अनेकांना आवडली. गेल्या काही काळामध्ये राहुल गांधींनी स्वतःची एक आश्वासक आणि सकारात्मक प्रतिमा उभारण्यास सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ते लोकांमध्ये मिसळत आहेत.

आधी त्यांनी भारत जोडो यात्रेतून सर्वसामान्यांना भेटत कन्याकुमारीपासून ते काश्मिरपर्यंतच्या सर्वसामान्य नागरीकांशी संवाद साधला. त्यानंतर विविध गर्दीच्या ठिकाणी कधी जेवताना, कधी लोकांशी बोलताना दिसत होते. त्यानंतर शनिवारी त्यांचे लडाखमधील बाईक रायडिंगचे फोटो समोर आले.

दरम्यान, यानंतर आता राजकारण तापले असून केंद्रीय मंत्रीमंडळातील मंत्र्यांनीच राहुल यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे.

राहुल यांनी लडाखमध्ये मोटारसायकल चालवतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली हिमालयीन प्रदेशात बनवलेल्या भव्य रस्त्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल राहुल गांधींचे कौतुक आणि आभार मानले आहेत.

काय म्हणाले किरेन रिजिजू?

रिजिजू यांनी सोशल मीडियात लिहिले आहे की, नरेंद्र मोदी सरकारने बनवलेल्या लडाखमधील उत्कृष्ट रस्त्यांचा प्रचार केल्याबद्दल राहुल गांधींचे आभार. यापूर्वी देखील राहुल गांधी यांनी काश्मीर खोऱ्यात पर्यटन कसे वाढत आहे हे दाखवून दिले होते. दरम्यान, त्यांनी सर्वांना आठवण करून दिली आहे की आता श्रीनगरच्या लाल चौकात शांततेने राष्ट्रध्वज फडकवता येतो.

मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही मानले आभार

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही ट्विटरवर म्हटले आहे की, "कलम 370 हटविल्यानंतरच्या घडामोडी पाहण्यासाठी आणि प्रसारित करण्यासाठी राहुल गांधी यांनी स्वत: लेह आणि लडाखमधील खोऱ्यात प्रवास केला. त्याची झलक पाहून आम्ही उत्साहित आणि आनंदी आहोत."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT