Delhi Minister Rajendra Pal Gautam  Dainik Gomantak
देश

Rajendra Pal Gautam Resigns: देवाला न मानणाऱ्या केजरीवालांच्या मंत्र्याचा राजीनामा

हिंदु देवतांवर बहिष्काराची घेतलेली शपथ; कुटूंबाला सोशल मीडियातून मिळाल्या होत्या धमक्या

गोमन्तक डिजिटल टीम

Rajendra Pal Gautam Resigns: दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारमधील समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी रविवारी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. काही दिवसांपुर्वीच त्यांनी एका कार्यक्रमात हिंदु देवतांवर बहिष्काराची शपथ घेतली होती. त्यावरून भाजपने 'आप' सरकारवर टीकेची झोड उठवली होती.

गौतम यांनी राजीनाम्यासोबत एक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मनुवादी मानसिकतेचे लोक मला आणि माझ्या कुटूंबाला धमक्या देत आहेत, मी पक्षाचा खरा सैनिक आहे. मी आपल्या समाजाच्या अधिकारांची लढाई यापुढेही लढत राहीन, पण माझ्यामुळे पक्षाला काही अडचण यावी असे मला वाटत नाही, असे गौतम यांनी म्हटले आहे.

गौतम यांनी लिहिले आहे की, मी मनाने आंबेडकरवादी आहे. विजयादशमी दिवशी मी बौद्ध धम्म दीक्षा सोहळ्यात उपस्थित होतो. त्याचा पक्षाशी काही संबंध नाही. येथे राजरत्न आंबेडकर यांच्या उपस्थितीत बाबासाहेब आंबेडकरांच्या 22 प्रतिज्ञा म्हटल्या गेल्या. त्या मी देखील म्हटल्या.

त्यानंतरपासून आम आदमी पार्टी आणि आमचे नेते अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले जात आहे. हे वेदनादायी आहे. भाजपने यात घाणेरडे राजकारण केले. त्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे. माझ्यामुळे केजरीवाल किंवा 'आप' अडचण होऊ नये, असे वाटते.

मनुवादी मानसिकतेच्या लोक मला आणि माझ्या कुटूंबियांना फोनवरून, सोशल मीडीयातून धमक्या देत आहेत. गेल्या काही वर्षांपासून पाहतो आहे की, समाजात महिलांचे बलात्कार करून खून केले जात आहेत. मिशी ठेवल्याने हत्या केली जाते, मंदिरात प्रवेश केल्याने, मुर्तीला स्पर्श केल्याने, घोड्यावरून वरात काढल्याने, पाण्याच्या घागरीला स्पर्श केल्यानेही हत्या होत आहेत. हे सर्व त्रासदायक आहे. मी समाजासाठी काम करत राहीन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 4 नाही 13 कोटींचा घोटाळा! गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गुजरातपर्यंत पसरले जाळे; जालन्यातून एकाला अटक

Lotulim Land Scam: लोटलीत जमीन विक्री घोटाळा उघड! राजकारण्याची गुंतवणूक असल्याचे उघड; संशयित ज्येष्ठ महिलेवर गुन्हा

Ranji Trophy 2025: गोव्याशी भिडणार RCBचा कॅप्टन! रणजी करंडकमध्ये रंगणार थरार; 15 वर्षांनंतर चुरशीची लढत

Goa Politics: खरी कुजबुज; ही तर भाजप प्रवेशाची नांदी!

Sal River Boat Incident: ..मच्छीमार बोट रुतली गाळात! साळ नदीत अडकली माणसे; कुटबण जेटीजवळील दुर्घटना

SCROLL FOR NEXT