Uddhav Thackeray: पक्षाचे नाव म्हणून 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' तर त्रिशुल, उगवता सूर्य या चिन्हांना पहिली पसंती?

उद्धव ठाकरे गट पक्षासाठी नवीन नाव, चिन्हांची यादी निवडणूक आयोगाकडे सोपवणार
Uddhav Thackeray, Aditya Thackeray
Uddhav Thackeray, Aditya ThackerayDainik Gomantak
Published on
Updated on

Uddhav Thackeray: निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव वापरण्यास बंदी घातल्यानंतर आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवल्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाने पक्षाच्या नवीन नावासाठी आणि चिन्हासाठी तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या नावासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि चिन्हासाठी त्रिशुलला पहिली पसंती असल्याचे समजते.

Uddhav Thackeray, Aditya Thackeray
Shiv Sena Symbol: मोठी बातमी! शिवसेनेचे पक्ष चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले

रविवारी उद्धव ठाकरे गटाची 'मातोश्री'वर बैठक होणार असून निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार पक्षाचे नाव आणि चिन्ह काय असेल, यावर चर्चा केली जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेनंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले. त्यामुळे उद्घव ठाकरे गटाला आता शिवसेना नावाचा किंवा धनुष्यबाण या पक्षचिन्हाचा वापर करता येणार नाहीय. त्यामुळे मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने पक्षाचे नाव आणि चिन्हासाठीची यादी निवडणूक आयोगाकडे पाठवणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार उद्धव ठाकरे गटाने पक्षाच्या नावासाठी दोन नावे निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे. यातील पहिले नाव आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे नाव आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. तर चिन्हांमध्ये उद्धव ठाकरे गटाती पहिली पसंती त्रिशुल या चिन्हासाठी आहे. त्याशिवाय चिन्हासाठी दुसरा पर्यात म्हणून उगवता सूर्य हे देखील चिन्ह आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत ही यादी निवडणूक आयोगाकडे द्यायची आहे.

Uddhav Thackeray, Aditya Thackeray
Vande Bharat on Track: वंदे भारतचा तुटलेला भाग दुरुस्त; पुन्हा धावणार रुळांवर

शिवसेना संपणार नाही, चिन्हाने फरक पडणार नाही : शरद पवार

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी औरंगाबाद येथे धनुष्यबाण चिन्ह गोठविण्याच्या निर्णयाबाबत बोलताना, निवडणूक आयोगाचा निर्णय धक्कादायक आहे, असे घडेल याची शंका वाटत होती. आयोगाच्या निर्णयाने शिवसेना संपणार नाही, उलट शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नवा जोष मिळेल. माझ्या पक्षाचे चिन्हही पाचवेळा बदलले गेले होते, पण फरक पडला नाही,

धनुष्यबाण शिवसेनेसाठी लकी

19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरेनी शिवसेनेची स्थापना केली होती. 1971 मध्ये शिवसेनेने पहिली निवडणूक लढवली तेव्हा खजुराचे झाड हे पक्षाचे चिन्ह होते. त्यानंतर रेल्वे इंजिन, ढाल तलवार अशी चिन्हेही शिवसेनेला मिळाली, त्याने फार यश मिळाले नाही. पण 1985 मध्ये शिवसेनेने धनुष्यबाण हे चिन्ह घेतले आणि मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवला. त्यानंतर 1995 मध्ये शिवसेनेने राज्यातही सत्ता मिळवली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com