Owaisi's Reply To Bhagwat: कंडोमचा सर्वाधिक वापर मुस्लिमांकडून; मुस्लिमांची लोकसंख्या वाढत नसून घटतीय!

असदुद्दीन ओवैसी यांचे प्रत्युत्तर, भागवत डेटा घेऊन बोलत नाहीत, मुस्लिमांचा जननरदर सर्वात कमी
AIMIM President Asaduddin Owaisi And Mohan Bhagwat
AIMIM President Asaduddin Owaisi And Mohan Bhagwat Dainik Gomantak
Published on
Updated on

Owaisi's Reply To Bhagwat: मुस्लिमांनी टेन्शन घेऊ नये, मुस्लिमांची लोकसंख्या वाढत नसून घटत चालली आहे, देशात कंडोमचा सर्वाधिक वापर मुस्लिम करतात, पण मोहन भागवत (Mohan Bhagwat) यावर बोलणार नाहीत, असा पलटवार ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) चे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी केला आहे.

AIMIM President Asaduddin Owaisi And Mohan Bhagwat
PM Modi Gujarat Visit: PM Modi आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

हैदराबाद येथील एका सभेत ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या लोकसंख्या नियंत्रणाच्या मुद्याविषयी ओवैसी बोलत होते.

ओवैसी म्हणाले की, लोकसंख्या नियंत्रण करायचे आहे, असे सांगितले जात आहे. मुस्लिमांची लोकसंख्या वाढत नाहीय. त्यामुळे विनाकारण टेन्शन घेऊ नका. उलट मुस्लिमांची लोकसंख्या घटत चालली आहे. मला टीव्ही डिबेटमध्ये बोलावले होते. मी त्यांना म्हटले की, भाजपच्या बड्या नेत्यांच्या वडीलांनी किती मुले-मुली जन्माला घातली?

मुस्लीमांचा एकूण जननदर घटत चालला आहे. जननदरात सर्वाधिक घट मुस्लिमांमध्येच झाली आहे. दोन मुले जन्माला घालण्यात जे अंतर असते त्याला स्पेसिंग म्हणतात. तर सर्वाधिक स्पेसिंग मुस्लिम करत आहेत. कंडोमचा सर्वाधिक वापरही मुस्लिम करत आहेत. पण मोहन भागवत यावर बोलणार नाहीत. लोकसंख्या कुठे वाढत चालली आहे भागवत साहेब? असा सवालही त्यांनी केला.

AIMIM President Asaduddin Owaisi And Mohan Bhagwat
Vande Bharat on Track: वंदे भारतचा तुटलेला भाग दुरुस्त; पुन्हा धावणार रुळांवर

ओवैसी यांनी केंद्र सरकारने 2020 मध्ये सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका प्रतिज्ञापत्राचा हवाला दिला. ते म्हणाले, मोदी सरकारने स्वतःच न्यायालयात सांगितले होते की, लोकसंख्या नियंत्रण ही सक्की होऊ शकत नाही आणि सरकारलाही अशी सक्ती करायची नाही.

ओवैसी यांनी नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, देशातील एकूण जनन दर २ टक्क्यापर्यंत पोहचला आहे. आणि यात सर्वात कमी जनन दर मुस्लिमांचा आहे. तथापि, मुस्लिमांचा जननदर किती आहे हे ओवैसी यांनी स्पष्ट केलेले नाही.

काय म्हणाले होते मोहन भागवत?

नागपुरमध्ये रा. स्व. संघाच्या विजयादशमी सोहळ्यात मोहन भागवत म्हणाले होते की, लोकसंख्या नियंत्रण आणि धर्माधारित लोकसंख्या असंतुलन हे असे मुद्दे आहेत ज्याकडे फारकाळ दुर्लक्ष करता येणार नाही. केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रणासाठी व्यापक धोरण बनवले पाहिजे. हे धोरण सर्वांना लागू असेल.

२०३० पर्यंत लोकसंख्येत भारत चीनला मागे टाकणार

२०११ च्या जनगणनेनुसार भारतात १ अब्ज २० कोटी 79.8 टक्के हिंदू आहेत. तर मुस्लिमांची लोकसंख्या 14.2 टक्के इतकी आहे. जगभरातील 94 टक्के हिंदू भारतात राहतात. जगात इंडोनेशियानंतर सर्वाधिक मुस्लिम भारतात आहेत. भारताची लोकसंख्या दर महिन्याला १० लाखाने वाढत असून या गतीनुसार भारत 2030 पर्यंत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com