PM Modi Dainik Gomantak
देश

'मनरेगा'चा 20 वर्षांचा प्रवास संपला! 1 जुलैपासून लागू झाला केंद्र सरकारचा 'हा' नवा हायटेक कायदा; आता मिळणार तब्बल 125 दिवस काम

Govt Rolls Out VB-G RAM G: ग्रामीण रोजगाराच्या क्षेत्रात केंद्र सरकारने आज, म्हणजेच 1 जुलैपासून एक ऐतिहासिक आणि अत्यंत मोठा धोरणात्मक बदल लागू केला.

Manish Jadhav

Govt Rolls Out VB-G RAM G: ग्रामीण रोजगाराच्या क्षेत्रात केंद्र सरकारने आज, म्हणजेच 1 जुलैपासून एक ऐतिहासिक आणि अत्यंत मोठा धोरणात्मक बदल लागू केला. देशातील सर्वात मोठी ग्रामीण रोजगार हमी योजना असलेल्या 'मनरेगा'चा (MGNREGA) प्रदीर्घ प्रवास आता अधिकृतरित्या समाप्त झाला. सरकारने मनरेगा कायदा 2005 रद्द केला असून, त्याच्या जागी 'VB-G RAM G' (विकसित भारत – गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन – ग्रामीण) हा संपूर्णपणे नवीन कायदा देशभरात लागू केला. या नव्या कायद्यामुळे केवळ योजनेचे स्वरुपच बदलले नाही, तर ग्रामीण मजुरांच्या दैनंदिन मजुरीच्या दरांमध्येही मोठी वाढ करण्यात आली.

नवीन कायद्यानुसार, देशभरातील ग्रामीण मजुरांना आता रोजच्या कामासाठी प्रति दिन 327.4 रुपये इतकी सुधारित मजुरी दिली जाणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांच्या दैनंदिन उत्पन्नात लक्षणीय सुधारणा होऊन त्यांचे राहणीमान उंचावण्यास मोठी मदत होणार आहे. जुन्या योजनेच्या तुलनेत या आधुनिक रोजगार हमी कायद्यात अनेक व्यावहारिक आणि कडक बदल करण्यात आले आहेत. जुन्या मनरेगा योजनेत वर्षातून 100 दिवसांच्या कामाची हमी दिली जात असे; मात्र आता नव्या कायद्यांतर्गत ग्रामीण कुटुंबांना एका आर्थिक वर्षात किमान 125 दिवसांच्या अकुशल रोजगाराची कायदेशीर हमी देण्यात आली.

या योजनेचा आर्थिक भार आता केवळ केंद्र सरकार उचलणार नसून, त्यासाठी निधी वाटपाचे 60:40 असे नवीन सूत्र ठरवण्यात आले. सामान्य राज्यांमध्ये 60 टक्के खर्च केंद्र सरकार आणि 40 टक्के खर्च संबंधित राज्य सरकार करणार आहे, तर ईशान्येकडील आणि डोंगरी राज्यांसाठी हे प्रमाण 90:10 असे ठेवण्यात आले. याशिवाय, शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांना मजूर टंचाई भासू नये म्हणून वर्षातून एकूण 60 दिवसांचा 'ब्लॅकआउट' म्हणजेच विश्रांतीचा कालावधी ठेवण्याची सूट राज्यांना देण्यात आली. या काळात रोजगार (Employment) हमीचे काम बंद राहील, जेणेकरुन मजूर शेतात काम करु शकतील.

या योजनेअंतर्गत आता केवळ तात्पुरती कामे न करता जलसुरक्षा आणि ग्रामीण पायाभूत सुविधांशी संबंधित शाश्वत व हायटेक मालमत्ता निर्माण करण्यावर भर दिला जाईल. या मोठ्या बदलामुळे मनरेगाचे जुने जॉब कार्ड धारक असलेल्या नागरिकांना घाबरण्याचे अजिबात कारण नाही. जोपर्यंत नवीन ग्रामीण रोजगार हमी कार्ड जारी केले जात नाहीत, तोपर्यंत जुने आणि ई-केवायसी प्रमाणित असलेले जॉब कार्ड्स पूर्णपणे वैध मानले जातील. त्याच कार्डच्या आधारे मजुरांना नवीन काम आणि वाढीव दराने मजुरी दिली जाईल, असे शासनाने स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar 2026: कौटुंबिक सुख, रोमान्स अन् अफाट पैसा...! शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन; 5 राशींना होणार तगडा धनलाभ

Savanar Maye tree fall: सावनार-मये येथे घरावर कोसळली झाडे, दोन लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान; मोठा अनर्थ टळला

रस्ता सुरक्षेपेक्षा दंडवसुलीला सरकारचे प्राधान्य; 22 ब्लॅकस्पॉटची दुरुस्त कधी? 1,520 मृत्यूंबाबत काँग्रेस सेवा दलाचे सवाल

Thivim Theft: थिवीत वीजतारांवर डल्ला! 83 हजार 437 रुपयांचा मुद्देमाल चोरीला; पश्चिम बंगालमधील 21 वर्षीय संशयिताला अटक

Chikhal Kalo Festival: माशेलचा चिखलकाला; सरकारी राज्योत्सव

SCROLL FOR NEXT