Allahabad High Court Dainik Gomantak
देश

मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी वाद: ''सर्व अर्ज 4 महिन्यांत निकाली काढा''

मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी वादाप्रकरणी गुरुवारी अलाहाबाद उच्च न्यायालयात (Allahabad High Court) सुनावणी झाली.

दैनिक गोमन्तक

मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी वादाप्रकरणी गुरुवारी अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यादरम्यान, उच्च न्यायालयाने मथुरा न्यायालयाला मूळ खटल्याशी संबंधित सर्व अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्याचे निर्देश दिले. सर्व अर्ज जास्तीत जास्त 4 महिन्यांत निकाली काढण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, सुन्नी वक्फ बोर्ड आणि इतर पक्षकार सुनावणीला उपस्थित न राहिल्यास एकतर्फी आदेश जारी करण्याचे निर्देश दिले होते. मनीष यादव यांच्या अर्जावर सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High Court) हा निर्णय दिला. न्यायमूर्ती सलील कुमार राय यांच्या एकल खंडपीठात ही सुनावणी झाली.

तसेच, मथुरा न्यायालयात (Court) जन्मभूमी वादाशी संबंधित सर्व प्रकरणांची सुनावणी पूर्ण करुन त्यांचा लवकरात लवकर निपटारा करण्याची मागणी करणारा अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जात मथुरेच्या न्यायालयात सुरु असलेल्या सर्व खटल्यांची एकत्रित सुनावणी करण्याची मागणीही करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: स्वप्नील अस्नोडकर यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी; बीसीसीआयच्या मोहाली येथील ‘सीओई’ शिबिरासाठी प्रशिक्षकपदी नियुक्ती

Goa Crime: मडगाव ज्वेलर्स हत्या प्रकरणात 'ओंकार'ला सहा वर्षांनंतर सशर्त जामीन; खटल्याच्या विलंबाचा आरोपीला फायदा

Colva Drain Pollution: कोलवा येथील नाल्यात कुजलेल्या मासळीचा खच, परिसरात दुर्गंधीने नागरिक हैराण; चार वर्षांपासून नाल्याची साफसफाई रखडली

कुंकळ्ळीत माणुसकीला काळिमा! अंध नातेवाईक महिलेचा अमानवीय छळ; जेवण-औषधांसाठी पैशांची मागणी केल्यानं अमानुष वागणूक

'गोव्यातील निर्मात्यांना मदत करा'! आमदार सरदेसाईंची हाक; सरकारी शिष्टमंडळाच्या कान्स दौऱ्यावरुन हल्लाबोल

SCROLL FOR NEXT