Jahangirpuri हिंसाचार प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक

जहांगीरपुरी हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
Jahangirpuri Violence
Jahangirpuri ViolenceDainik Gomantak
Published on
Updated on

जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीनिमित्त झालेल्या हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. अब्दुल इलियास राजा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जहांगीरपुरी हिंसाचारातून पोलिसांनी आरोपीला अटक केले. अब्दुलवर हिंसाचाराच्या दिवशी जमावात सामील होऊन जहांगीरपुरीचा (Jahangirpuri) हिंसाचार भडकावल्याचा आरोप आहे. (Another accused arrested in Jahangirpuri violence case)

Jahangirpuri Violence
पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आजचे तुमच्या शहरातील इंधनाचे दर

या हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत तीन अल्पवयीनांसह 37 जणांना पकडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणातील व्हिडिओ फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे हिंसाचारात सहभागी असलेल्या इतर आरोपींची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासोबतच अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केल्यानंतर हिंसाचारात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

जहांगीरपुरी हिंसाचाराशी संबंधित 15 आरोपींविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. या फरार आरोपींचा हिंसाचारात मोठा हात असल्याचे गुन्हे शाखेच्या तपासातून खरे बाहेर आहे. यातील बहुतांश आरोपींचे मोबाईल बंद असून या 15 आरोपींपैकी पाच जण पश्चिम बंगालमध्ये लपून बसल्याचे संकेत पोलिसांना मिळालेले आहेत. आता पोलीस या आरोपींच्या शोधात छापे टाकताना दिसून येत आहेत.

Jahangirpuri Violence
असानी चक्रीवादळाचा प्रभाव, कोलकातामध्ये जोरदार पाऊस, NDRF च्या 50 तुकड्या तैनात

पोलिस तपासात त्यांचा हिंसाचारात सहभागी असल्याचे उघड झाले असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे आरोपी हिंसाचाराच्या वेळी दंगल करताना स्पष्ट पणे दिसून येत आहेत. व्हिडीओ फुटेजनंतर परिसरातील नागरिकांकडून त्यांच्याविषयी माहिती घेतली जात असून त्यासोबतच त्यांच्या मोबाईलवरून त्यांचे लोकेशन देखील ट्रेस केले जात आहे.

उत्तर-पश्चिम दिल्लीच्या महेंद्र पार्क परिसरात काही किशोरवयीन मुलांनी केलेल्या गैरकृत्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी अटकेत घेतले आहे. जहांगीरपुरी येथील रहिवासी असलेल्या शिव कुमारने वस्तुस्थितीची पडताळणी न करता जमाव भडकावण्यासाठी विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याचे देखील वृत्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com