Charminar Fire Dainik Gomantak
देश

Charminar Fire: हैद्राबादच्या चारमिनार येथे भीषण आग, 17 जणांचा मृत्यू; पाहा Video

Hyderabad Fire News: तेलंगणाची राजधानी हैद्राबादमधून सध्या मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध चारमिनारजवळील एका घरात भीषण आग लागली आहे.

Sameer Amunekar

हैद्राबाद: तेलंगणाची राजधानी हैद्राबादमधून सध्या मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध चारमिनारजवळील एका घरात भीषण आग लागली आहे. गुलजार हाऊसच्या एका इमारतीत ही आग लागली आहे. ही घटना रविवारी सकाळी ६ वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे.

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या ११ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, असं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केले आहे. इमारतीत अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

१७ जणांचा मृत्यू

तेलंगणा अग्निशमन आपत्ती प्रतिसाद आपत्कालीन आणि नागरी संरक्षण विभागाने १७ जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. सर्व मृतांच्या नावांची यादीही जाहीर करण्यात आली आहे.

मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपये

पंतप्रधान मोदींनीही या अपघाताबद्दल शोक व्यक्त केले आहे. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना २ लाख रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनीही घटनास्थळी भेट दिली आहे. ते म्हणाले, 'पोलिसांनी आगीच्या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे परंतु याची पुष्टी संबंधित अधिकाऱ्यांकडूनच केली जाईल. मृतांमध्ये काही मुलांचाही समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT