तेलंगणा: कुख्यात माओवादी कमांडर किशनजी याची पत्नी सुजाताने अखेर ४३ वर्षानंतर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. सुजाताच्या आत्मसर्पणामुळे माओवादी संघटनांना मोठा झटका बसला आहे. सरकारने सुजातावर एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. अखेर सुजाताने तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.
माओवादी कमांडर किशनजी याची पत्नी असणारी सुजाता नक्षली संगठना सीपीआय (माओवादी) केंद्रीय समितीची सदस्य आहे. तिच्याकडे दक्षिण विभागाचे प्रमुखपद आहे. गेल्या अनेक वर्षापासून छत्तीसगडच्या बस्तरमध्ये अनेक नक्षली कारवाईत तिचा समावेश आढळून आला आहे. सुजाताची तुलना चंदन तस्कर वीरप्पन याच्याशी केली जाते. एवढेच नव्हे तर कुख्यात नक्षलवादी हिडमाला देखील तिने प्रशिक्षण दिल्याची माहिती समोर आली होती.
भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या लिस्टमध्ये सुजाताची मोस्ट वॉन्टेड म्हणून नोंद आहे. बस्तरमध्ये अनेक नक्षली कारवाईत तिचा थेट समावेश असल्याचे आढळून आले आहे. २०२४ मध्ये तेलंगणा पोलिसांनी सुजाताला अटक केल्याची अफवा पसरली होती. याचे स्वत: सुजाताने खंडन करत अटकेची बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले होते.
सुजाता नक्षली संगठनांमध्ये आयर्न लेडी म्हणून कुख्यात आहे. कुख्यात माओवादी किशनजी याची पत्नी म्हणूनही ती प्रसिद्ध आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या चकमकीत किशनजीचा २०११ मध्ये मृत्यू झाला होता. यानंतर सुजाता अधिक सक्रियपणे काम करत होती. छत्तीसगड आणि तेलंगणा पोलिस गेल्या अनेक वर्षापासून तिचा शोध घेत होते. आता तिने आत्मसमर्पण केल्याने मोओवादी संघटना कमजोर होणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.