Watch Video:"जेणें तुमकां पेजेक लायलां तें सरकार तुमकां जाय?सरदेसाईंचा तरुणांना सवाल; बेरोजगारीत गोवा दुसऱ्या क्रमांकावर

Goa unemployment rate 2025: राज्यातील तरुण नोकरीची वाट पाहत आहेत; मात्र सरकार त्यांची दखल घेत नाही, असा गंभीर आरोप गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला
Goa unemployment
Goa unemploymentDainik Gomantak
Published on
Updated on

Youth Unemployment in Goa: गोव्यात नोकरीचा तुटवडा असून राज्यातील तरुण नोकरीची वाट पाहत आहेत; मात्र सरकार त्यांची दखल घेत नाही, असा गंभीर आरोप गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष आणि फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे. सरकारने तरुणांना 'पेजेला लावलंय' अशा शब्दांत त्यांनी एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून थेट सरकारवर निशाणा साधला आहे.

बेरोजगारीच्या आकडेवारीवर सरकारवर टीका

सरदेसाई यांनी तरुणांसाठी रोजगार सर्वात महत्त्वाचा असल्याचे म्हटले. नियोजन आणि कार्यक्रम अंमलबजावणी विभागाकडून जाहीर झालेल्या आकडेवारीचा संदर्भ देत ते म्हणाले की, गोव्यातील बेरोजगारीचा दर ८.९% इतका आहे. या दरामुळेच गोवा हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक बेरोजगार राज्य बनलेय. तसेच महिलांमधील बेरोजगारीचा दर १७% इतका असल्याने या आकड्यासह गोवा देशात तिसऱ्या स्थानी असल्याचे त्यांनी सांगितले.

Goa unemployment
Unemployment In Goa: गोव्यात PhD धारकच बेरोजगार! बेकारांमध्ये बारावी झालेले आघाडीवर; पदवीधर दुसऱ्या स्‍थानी

नोकरीसाठी युवक राज्य सोडत असल्याचा आरोप

सरदेसाई यांनी आरोप केला आहे की, सरकारच्या बेजबाबदारपणामुळे शिक्षित तरुण गोवा सोडून जात आहेत. ते म्हणाले, “मोपा विमानतळ असूनही हेच तरुण नोकरीच्या शोधात लंडनच्या विमानतळावर जात आहेत.” त्यांच्या मते, गोव्यात एकही नवीन कंपनी येत नाहीये आणि शिक्षित युवक नोकरीच्या शोधात राज्य सोडून जात आहेत. 'हाच तो बदल जो सरकारने घडवलाय' अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली.

नोकऱ्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा दावा

राज्यात आता कोण किती हुशार याला काहीच किंमत राहिलेली नाही, असा दावाही सरदेसाई यांनी केला. त्यांनी आरोप केला की, बनावट प्रमाणपत्रे वापरून नोकऱ्या दिल्या जात आहेत आणि नोकऱ्या विकण्याचा धंदाच सुरू आहे. या सर्वासाठी त्यांनी थेट राज्य सरकारला जबाबदार धरले आणि शेवटी आमदार सरदेसाई यांनी राज्यातील युवकांना प्रश्न केला की, “तुम्हाला असे सरकार हवे आहे का, ज्याने तुम्हाला बेरोजगार बनवले आणि नोकरीसाठी राज्यातून बाहेर पडायला भाग पाडले?”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com