Chhattisgarh Crime Dainik Gomantak
देश

Chhattisgarh: छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई; 12 नक्षलवादी ठार!

Chhattisgarh Crime: छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील पिडिया भागात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली, ज्यामध्ये 12 नक्षलवादी ठार झाले.

Manish Jadhav

Chhattisgarh Crime: छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील पिडिया भागात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली, ज्यामध्ये 12 नक्षलवादी ठार झाले. या चकमकीत सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाल्याचेही वृत्त आहे. राज्याचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनीही 12 नक्षलवाद्यांच्या हत्येला दुजोरा दिला आहे.

याबाबत माहिती देताना छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई म्हणाले की, ‘’बिजापूर जिल्ह्यातील गांगलूर भागात नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली... 12 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. मी आमचे सैनिक आणि वरिष्ठ अधिकारी यांचे अभिनंदन करतो. या मोहिमेत सुकमा, बिजापूर आणि दंतेवाडा येथील डीआरजी आणि कोब्रा फोर्सच्या 210 बटालियन आणि एसटीएफच्या जवानांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात ऑपरेशन राबवले. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य आणि शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.’’

याआधी, चकमकीची माहिती देताना दक्षिण बस्तरचे पोलीस उपमहानिरीक्षक कमलोचन कश्यप म्हणाले होते की, ‘या भागात सर्च ऑपरेशन अजूनही सुरु आहे आणि पोलीस दल अजूनही जंगलात आहे.’ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘ही चकमक नक्षलवादी आणि जिल्हा राखीव रक्षक (DRG), स्पेशल टास्क फोर्स (STF) यांच्यात झाली.’

दरम्यान, सुरक्षा कर्मचाऱ्यांचे पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना गंगलूर पोलिस स्टेशन हद्दीतील पिडिया गावाजवळील जंगलात ही चकमक झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकमाचे एसपी किरण चव्हाण, विजापूरचे एसपी जितेंद्र कुमार यादव आणि दंतेवाडा एसपी गौरव रॉय चकमकीच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या जवानांच्या सतत संपर्कात आहेत.

गेल्या महिन्यातही सुरक्षा दलांनी छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांना सलग दोन मोठे झटके दिले होते. कांकेरमध्ये 29 नक्षलवाद्यांना ठार केल्यानंतर नारायणपूरमध्ये 10 नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आले होते. त्याचवेळी, या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत एकूण 99 माओवादी सुरक्षा दलांनी मारले आहेत, जे 2022 आणि 2023 मध्ये मारल्या गेलेल्या एकूण 22 आणि 30 माओवाद्यांपेक्षा जास्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT