Chhattisgarh Naxalites Encounter: सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार, सर्च ऑपरेशन सुरुच!

Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले आहेत.
seven naxalites killed in encounter with security forces
seven naxalites killed in encounter with security forces Dainik Gomantak
Published on
Updated on

Chhattisgarh Naxalites Encounter: छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले आहेत. घटनास्थळावरुन दोन महिलांसह सात नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले आहेत. यापूर्वी, माहिती देताना पोलिसांनी सांगितले होते की, नक्षलग्रस्त नारायणपूर (Narayanpur) आणि कांकेर (Kanker) जिल्ह्यांच्या सीमा भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरु आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सात नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे. बस्तरचे आयजी पी सुंदरराज (Bastar IG P ​​Sundarraj) यांनी सांगितले की, चकमकीच्या ठिकाणाहून एके 47 सह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. सुरक्षा दलाचे सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, कांकेर जिल्ह्यातील सीमावर्ती भाग असलेल्या अबुझमद आणि नारायणपूरमध्ये पुन्हा एकदा नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत अनेक नक्षलवादी (Naxalites) ठार झाल्याचा दावा केला जात आहे.

seven naxalites killed in encounter with security forces
Chhattisgarh Crime: सहा महिन्यांत 173 अटक, 194 सरेंडर अन् 33 ठार; छत्तीसगडमध्ये माओवाद्यांविरोधीतील कारवाई तीव्र

सोमवारी पोलिसांना माहिती मिळाली

वृत्तानुसार, छत्तीसगड (Chhattisgarh) आणि महाराष्ट्र सीमेवरील तकामेटा भागात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे सोमवारी रात्री उशिरा सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले. मंगळवारी सकाळी जवान जेव्हा या भागात पोहोचले तेव्हा त्यांना पाहताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरु केला. यानंतर जवानांनीही नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिल्याचे पोलिसांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार नक्षलवाद्यांचे मोठे कॅडर येथे उपस्थित आहे. त्यामुळे आतापर्यंत किती नक्षलवादी मारले गेले हे पोलिसांना सांगता आलेले नाही.

seven naxalites killed in encounter with security forces
Chhattisgarh: छत्तीसगडच्या सुकमामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, 3-4 नक्षलवादी ठार; चकमच सुरुच!

यापूर्वी, 5 एप्रिल रोजी छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला होता. एका अधिकाऱ्याने सांगितले होते की, जिल्हा रिझर्व्ह गार्ड (DRG), बस्तर फायटर्स आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) चे जवान किरंदुल पोलीस ठाण्याच्या सीमेवर असलेल्या जंगलात नक्षलविरोधी मोहिमेवर होते. यावेळी दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com