Manuel Frederick Passes Away Dainik Gomantak
देश

Manuel Frederick Passes Away: क्रीडा विश्वात हळहळ! भारतीय हॉकी संघाचे माजी खेळाडू मॅन्युएल फ्रेडरिक यांचे निधन, 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Manuel Frederick: हॉकी जगतातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. १९७२ च्या म्युनिक ऑलिंपिकमध्ये भारताला गौरव मिळवून देणारे कांस्यपदक विजेते मॅन्युएल फ्रेडरिक यांचे शुक्रवारी निधन झाले.

Sameer Amunekar

हॉकी जगतातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. १९७२ च्या म्युनिक ऑलिंपिकमध्ये भारताला गौरव मिळवून देणारे कांस्यपदक विजेते मॅन्युएल फ्रेडरिक यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांनी ३१ ऑक्टोबर रोजी शेवटचा श्वास घेतला. ते १० महिन्यांपासून प्रोस्टेट कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांनी आता या जगाचा निरोप घेतला आहे. या बातमीने भारतीय हॉकीमध्ये धक्का बसला आहे.

मॅन्युएल फ्रेडरिक यांचा जन्म २० ऑक्टोबर १९४७ रोजी केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील बर्नासिरी येथे झाला. भारतासाठी कांस्यपदक जिंकणारा फ्रेडरिक हा केरळचा पहिले खेळाडू ठरले.

त्यांच्यानंतर केरळमध्ये जन्मलेले पीआर श्रीजेशने टोकियो २०२० आणि पॅरिस ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकले. २०१९ मध्ये, भारतीय खेळांमध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल फ्रेडरिक यांना युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 'ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार' देऊन सन्मानित केले.

हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी शोक व्यक्त करताना म्हटले आहे की, "मॅन्युएल फ्रेडरिक हे भारताच्या सर्वोत्तम गोलकीपरपैकी एक होते. भारतीय हॉकीच्या सुवर्णकाळातील त्यांचे योगदान नेहमीच लक्षात राहील. त्यांच्या कामगिरीने भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक खेळाडूंना प्रेरणा दिली. भारतीय हॉकीने एक दिग्गज गमावला आहे, परंतु त्यांचा वारसा कायमचा जिवंत राहील."

दरम्यान, हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोलानाथ सिंह यांनीही श्रद्धांजली वाहिली, ते म्हणाले की, "हा हॉकी जगतासाठी खूप दुःखद दिवस आहे. मॅन्युएल फ्रेडरिक केरळसारख्या अपारंपारिक हॉकी राज्यातून आले असूनही, ते असंख्य तरुणांसाठी प्रेरणादायी होते. त्यांची शिस्त आणि देशासाठीची सेवा नेहमीच लक्षात ठेवली जाईल. या कठीण काळात आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत उभे आहोत."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 2026: शनिदेवांच्या लाडक्या राशीवर होणार धनाचा वर्षाव! शुक्राच्या साथीनं चमकणार नशीब; नोकरीत बढती अन् व्यापारात दुप्पट नफा

मानवजातीच्या विनाशाची नवी वेळ निश्चित! 100 कोटी वर्षांनंतर सजीव सृष्टीचा होणार 'द एंड'; नासाच्या सुपरकॉम्प्युटरचा थरारक अंदाज

एलपीजी सिलेंडर की पीएनजी? स्मार्ट किचनसाठी निवडा योग्य पर्याय; स्टोरेजच्या कटकटीपासून ते बुकिंगच्या वेटिंगपर्यंत सिलेंडरची 5 आव्हाने

Global Terrorist Amir Hamza Attack: लाहोरमध्ये रक्ताचा सडा! हाफिज सईदचा विश्वासू आमीर हमजावर खूनी हल्ला; अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Goa IPL Betting Racket Busted: 6 जणांना बेड्या, 50 एटीएम कार्ड अन् 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त; सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT