Manipur Violence Dainik Gomantak
देश

Manipur Violence: मणिपूरमध्ये पिता-पुत्रासह चौघांची गोळ्या झाडून हत्या, बिष्णुपूरमध्ये तणाव

सिंग म्हणाले की, अलीकडेच सुरक्षा दलांवर झालेले हल्ले पाहता, तीन कमांडो तुकड्या सीमेवरील शहरातील इतर भागात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Ashutosh Masgaunde

Manipur Violence, Four including father-son shot in Manipur, tension in Bishnupur:

मणिपूरमध्ये जातीय हिंसाचारात गेल्या २४ तासांत वेगवेगळ्या घटनांमध्ये पिता-पुत्रासह चार जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत.

बिष्णुपूर जिल्ह्यातील बिष्णुपूर पोलीस ठाण्यांतर्गत निंगथौखॉंग खा खुनौ येथे गुरुवारी दुपारी चार वाजता पिता-पुत्रासह तिघांची सशस्त्र लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. ओईनम बामोंजाओ, त्यांचा मुलगा ओइनम मनिटोम्बा आणि थियम सोमेन अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व निंगथौखॉन्ग खा कुनौ येथील रहिवासी होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघेजण राज्य सरकारच्या निंगथौखॉंग पाणीपुरवठा योजनेच्या मिनी वॉटर टँकमधून पाणी आणत असताना, सुमारे पाच अज्ञात सशस्त्र व्यक्तींनी तिघांना थांबवून जवळून गोळ्या झाडल्या. गुन्हा केल्यानंतर मारेकरी चुराचंदपूर जिल्ह्याच्या हद्दीतील जवळच्या टेकडीकडे पळून जाण्यात यशस्वी झाले.

त्याचप्रमाणे 26 वर्षीय मेईतेई 'व्हिलेज डिफेन्स व्हॉलंटियर', टाकेलालंबम मनोरंजन हा बुधवारी रात्री 11 च्या सुमारास इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील कांगचुप येथे झालेल्या हल्ल्यात ठार झाला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत

मणिपूर सरकारचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंग यांनी सांगितले की, हिंसाग्रस्त मोरेह शहरात राज्य पोलिसांच्या तीन कमांडो तुकड्या तैनात करणे पुरेसे नाही, ज्यामुळे सुरक्षा दल अतिरेक्यांच्या हिंसाचाराचे बळी ठरत आहेत.

सिंग म्हणाले की, अलीकडेच सुरक्षा दलांवर झालेले हल्ले पाहता, तीन कमांडो तुकड्या सीमेवरील शहरातील इतर भागात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी सकाळी मोरेहमधील तीन ठिकाणी कमांडो चौक्यांना लक्ष्य केले.

सिंह म्हणाले की, गुरुवारी संध्याकाळी दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. बीएसएफची एक तुकडी, लष्कराच्या दोन तुकड्या आणि चार कॅस्पर वाहनांसह मजबुतीकरण मोरेह येथे पोहोचले आहे. याशिवाय केंद्रीय गृह मंत्रालयाचे हेलिकॉप्टरही या भागात पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT