Indian Navy Helicopter Crashes: कोचीमध्ये नौदलाचे हेलिकॉप्टर कोसळले, एकाचा मृत्यू

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी नियमित प्रशिक्षणादरम्यान चेतक हेलिकॉप्टरचा कोची येथील भारतीय नौदलाचे मुख्यालय INS गरुडच्या धावपट्टीवर अपघात झाला.
Indian Navy Helicopter Crashes
Indian Navy Helicopter CrashesDainik Gomantak

Indian Navy Helicopter Crashes in Kochi: केरळमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी नियमित प्रशिक्षणादरम्यान चेतक हेलिकॉप्टरचा कोची येथील भारतीय नौदलाचे मुख्यालय INS गरुडच्या धावपट्टीवर अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र या घटनेबाबत नौदलाने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.

दरम्यान, हेलिकॉप्टरमध्ये एका अधिकाऱ्यासह दोन जण असल्याचे सांगण्यात आले. दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. प्रशिक्षणादरम्यान हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले. यादरम्यान हेलिकॉप्टरचा अपघात झाला.

यामध्ये हेलिकॉप्टरचा (Helicopter) पायलट जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तर त्याच्या शेजारी बसलेल्या अधिकाऱ्याचा (कथित) मृत्यू झाला आहे. माहिती मिळालेल्या केरळ पोलीस आणि लष्कराच्या यंत्रणांनी तपास सुरु केला आहे. यासोबतच बचावकार्यही करण्यात येत आहे.

नौदलाच्या 'IL-38 सी ड्रॅगन'ने 46 वर्षांच्या सेवेनंतर नौदलाला निरोप दिला

दरम्यान, मंगळवारी नौदलाच्या 'इल्युशिन-38 सी ड्रॅगन' नावाच्या लांब पल्ल्याच्या समुद्री निगराणी करणाऱ्या विमानाने 46 वर्षांच्या 'वैभवशाली' सेवेनंतर निरोप घेतला. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या विमानाला निरोप देण्यासाठी गोव्यातील (Goa) दाबोळी येथे आयएनएस हंसावर एका समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार, IL-38 स्क्वॉड्रनचे वरिष्ठ अधिकारी आणि सैनिक आणि इतर मान्यवर त्यांच्या कुटुंबीयांसह यावेळी उपस्थित होते.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, INAS 315 ला IL 38 सोबत 1 ऑक्टोबर 1977 रोजी नौदल ताफ्यात समाविष्ट करण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com