Manipur Violence
Manipur Violence Dainik Gomantak
देश

Manipur Violence 2023: मणिपूरमध्ये सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरु, 40 बंडखोर ठार!

Manish Jadhav

Manipur Violence 2023: मणिपूरमधील परिस्थिती सामन्य होण्याचं नाव घेत नाहीये. यातच, मणिपूर पोलिसांचे कमांडो आणि बंडखोरांमध्ये राज्याच्या अनेक भागात गोळीबार सुरु आहे. गेल्या 8 तासांपासून दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरु आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी सांगितले की, आतापर्यंत 40 बंडखोऱ्यांना ठार मारण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

हे बंडखोर एम-16 आणि एके-47 असॉल्ट रायफल आणि स्नायपर गनचा वापर सामान्य नागरिकांवर (Citizens) करत होते.

अनेक गावातील घरे जाळण्यासाठी ते आले होते. मात्र, लष्कर आणि इतर सुरक्षा दलांच्या मदतीने आम्ही ताबडतोब कारवाई सुरु केली आहे.

सीएम बिरेन सिंह यांनी दावा केला आहे की, बंडखोर नि:शस्त्र नागरिकांवर गोळीबार करत आहेत.

मणिपूरला तोडण्याचा प्रयत्न करणारे सशस्त्र बंडखोर आणि राज्य सरकार यांच्यात ही लढाई आहे.

बंडखोरांनी 5 भागांवर हल्ले केले

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, काल रात्री दोन वाजता बंडखोरांनी इम्फाळ खोरे आणि आसपासच्या भागात एकाच वेळी हल्ला केला.

यामध्ये सेकमाई, सुगनू, कुंबी, फयेंग आणि सेराऊ प्रदेशांचा समावेश आहे. इतर अनेक भागात गोळीबार आणि रस्त्यावर बेवारस मृतदेह पडल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, सेकमाई येथील चकमक संपल्याचे बोलले जात आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, इम्फाळमधील रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) च्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, फयेंगमधील चकमकीत जखमी अवस्थेत 10 लोक रुग्णालयात पोहोचले आहेत.

त्याचवेळी, चंदोनपोकपी, बिशनपूर येथे 27 वर्षीय शेतकरी खुमंथेम केनेडी यांचा अनेक गोळ्या लागल्याने मृत्यू झाला आहे.

त्यांचा मृतदेह रिम्समध्ये नेण्यात आला असून अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. केनेडी यांच्या पश्चात पत्नी आणि लहान मुलगा आहे.

दुसरीकडे, गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) उद्या मणिपूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान त्यांनी मेईतेई आणि कुकी या दोन्ही समुदायांना शांतता राखण्याचे आणि सामान्य स्थिती आणण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले आहे.

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनीही काल सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचा दोन दिवसीय दौरा केला.

इम्फाळ खोऱ्यात आणि आजूबाजूला राहणारे मेईतेई लोक आणि टेकड्यांमध्ये राहणारी कुकी जमाती यांच्यात जातीय हिंसाचार सुरु आहे.

अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात मेईतेई समुदयाचा समावेश करण्याची मागणी होत आहे. यावरुन या दोन्ही समुदयामध्ये हिंसाचार सुरु झाला आहे. आतापर्यंत 70 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 3 मे रोजी संघर्ष सुरु झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT