Manipur: मणिपूरमध्ये आदिवासी उतरले रस्त्यावर, इंटरनेट बंद; वाचा संपूर्ण प्रकरण

Manipur Meitei Community: मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात बुधवारी इंटरनेट बंद करण्यात आले. मोठ्या मेळाव्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
Manipur
ManipurDainik Gomantak
Published on
Updated on

Manipur Meitei Community: मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात बुधवारी इंटरनेट बंद करण्यात आले. मोठ्या मेळाव्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

वास्तविक पाहता राज्यातील दहाही डोंगरी जिल्ह्यांमध्ये बहुसंख्य मैतेई समाजाचा एसटीमध्ये समावेश करण्याच्या मागणीला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून हजारो आदिवासी 'एकता मार्च'मध्ये सहभागी झाले आहेत. हिंसाचाराच्या बातम्याही आल्या. आदेशात म्हटले आहे की, बिष्णुपूर जिल्ह्याच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींच्या एकत्र येण्यावर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

आदिवासी मैतेई समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीला हे लोक विरोध करत आहेत.

ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन ऑफ मणिपूर (एटीएसयूएम) ने सांगितले की, मैतेई समुदायाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी जोर धरत आहे, त्याविरोधात त्यांनी मोर्चा काढला आहे.

राज्यातील लोकप्रतिनिधी मैतेईच्या मागणीला उघडपणे पाठिंबा देत असून आदिवासींच्या हिताचे रक्षण करण्यासाठी एकत्रितपणे योग्य उपाययोजना करण्याची गरज असल्याचे विद्यार्थी संघटनेने म्हटले आहे.

Manipur
Manipur Politics: मणिपूरमध्ये ऑपरेशन लोटस, JDU च्या 5 आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

तसेच, मैतेई लोक मणिपूरच्या (Manipur) डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात, जे राज्याच्या सुमारे दहा टक्के क्षेत्रफळ आहे. म्यानमार आणि बांगलादेशींच्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर स्थलांतरामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा समुदायाचा आहे.

दुसरीकडे, दुर्गम डोंगराळ भागातील आदिवासी लोक मोर्चात सहभागी होण्यासाठी बसेस आणि खुल्या ट्रकमधून जवळच्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पोहोचले.

पोलिसांनी (Police) सांगितले की, आदिवासी समाजातील हजारो लोक मोर्चात सामील झाले होते, ज्यांनी मैतेई समुदायाला एसटी दर्जा देण्याच्या विरोधात घोषणाबाजी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com