Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. यावेळी राजधानी इंफाळमध्ये हिंसाचार झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी लष्कर आणि निमलष्करी दलांना पाचारण करण्यात आले आहे.
न्यू चाकोन भागातील स्थानिक बाजारपेठेत एका जागेवरुन वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. मैतई आणि कुकी समाजातील भांडणावरुन हा वाद सुरु झाला.
त्यानंतर या प्रकरणाने हळूहळू पेट घेतला. त्यानंतर जाळपोळीच्या बातम्या समोर आल्या. सध्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भडकलेल्या हिंसाचारात एका चर्चला आग लावण्यात आली. लष्कर घटनास्थळी पोहोचले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
त्याचवेळी, रविवारी इंफाळमध्ये काही घरे जाळण्यात आली. येथे स्थानिक लोकांच्या निदर्शनास बंदी घालण्यात आली आहे.
जाळपोळ आणि खोट्या बातम्यांच्या वाढत्या घटना पाहता मणिपूर (Manipur) सरकारने इंटरनेट आणि मोबाईल सेवा तात्काळ प्रभावाने बंद केली आहे. पुढील पाच दिवसांसाठी म्हणजेच 26 मे पर्यंत हा आदेश जारी करण्यात आला आहे.
परिसरातील घरांना लक्ष्य करण्यात येऊ नये म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समाजकंटक सोशल मीडियाचा (Social Media) वापर हेट स्पीचचा प्रसार करण्यासाठी, सार्वजनिक भावना भडकावण्यासाठी आणि हिंसाचार कायम ठेवण्यासाठी करु शकतात.
दुसरीकडे, एका महिन्याहून अधिक काळ मणिपूर अनेक मुद्द्यांवरुन धगधगत आहे. शांततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, आदिवासींनी 3 मे रोजी अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी लॉंग मोर्चा काढला होता.
तेव्हा डोंगरी जिल्ह्यात संघर्षाची परिस्थीती निर्माण झाली होती. आठवडाभराहून अधिक काळ सुरु असलेल्या या हिंसाचारात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
हिंसाचारात कोट्यवधींची संपत्ती नष्ट झाली आणि हजारो लोकांना घरे सोडावी लागली. सरकारने कॅम्प उभारले होते, जिथे लोकांनी रात्र काढली.
याशिवाय, कुकी ग्रामस्थांना आरक्षित वनजमिनीतून बेदखल केल्याचे वृत्त आहे, त्यानंतर तणाव वाढला आणि चकमकी सुरु झाल्या. त्यामुळे अनेक लहानमोठ्या दंगलीही भडकल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.