Manipur Violence: Dainik Gomantak
देश

Manipur Violence: आणखी किती जीव जाणार? मणिपूरला पुन्हा हिंसाचाराच्या झळा; आतापर्यंत 100 जणांचा मृत्यू

मणिपूर हिंसाचारावर विरोधी पक्ष सर्वपक्षीय बैठकीची मागणी करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत सर्वपक्षीय बैठक का बोलावली नाही, असे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

Ashutosh Masgaunde

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा जातीय हिंसाचार उसळला आहे. राज्यातील खामेनलोक येथे गोळीबार झाला, ज्यात 9 जणांचा मृत्यू झाला. तर गेल्या महिन्यापासून सुरु असलेल्या या हिंसाचारात आतापर्यंत एकूण 100 जणांना जीव गमावावा लागला आहे.

मणिपूरमधील हिंसाचाराच्या ताज्या घटनांबाबत काँग्रेसने बुधवारी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मणिपूरच्या लोकांवर झालेल्या गुन्ह्याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही विचारले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक का बोलावत नाहीत? काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर मणिपूरमधील परिस्थितीवर कोणताही विशेष परिणाम झालेला नाही.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्विट केले की, 'मणिपूरमध्ये कालच्या हिंसाचारात नऊ जणांचा मृत्यू झाला. मोदी सरकार ईशान्येबाबत खोटो बोलले त्यामुळे मानवतेचा आवाज दाबला गेला आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी दावा केला की, ईशान्येकडील सीमावर्ती राज्य हिंसाचाराच्या आगीत ढकलले गेले आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी मणिपूरमधील हिंसाचार आणि शस्त्रास्त्रांची लूट यासारख्या घटनांचा संदर्भ देत म्हणाले, 'पंतप्रधान अजूनही मूक प्रेक्षक आहेत. मोदीजींनी मणिपूरवर एकाही बैठक घेतली नाही. मात्र काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या अकार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत राहील.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी विचारले की, 'मणिपूरमध्ये शांतता आणि सामान्य स्थिती पूर्ववत करण्यात भाजपचे डबल इंजिन सरकार का यशस्वी झाले नाही? क्षुल्लक राजकीय फायद्यासाठी भाजप विविध जाती समूहांमधील दरी वाढवत आहे का?'

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही विचारले की, 'पंतप्रधानांनी राजकीय तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक का बोलावली नाही? आता मोदी सरकारने जबाबदारी स्वीकारण्याची आणि मणिपूरच्या लोकांवर केलेल्या गुन्ह्यासाठी जबाबदार बनण्याची वेळ आली आहे?

खामेनलोकमध्ये 9 ठार, 10 जखमी

हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील खमेनलोक भागातील एका गावात संशयित अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान नऊ जण ठार आणि 10 जण जखमी झाले. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली.

मणिपूरमध्ये महिनाभरापूर्वी उसळलेल्या वांशिक हिंसाचारात किमान 100 लोकांचा मृत्यू झाला असून 310 जण जखमी झाले आहेत. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्कर आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

मणिपूरमध्ये हिंसक संघर्ष थांबेना

जयराम रमेश यांनी ट्विट केले की, 'मणिपूरच्या लोकांच्या वेदना संपत नाहीत. त्यांची व्यथा ही देशाची व्यथा आहे, पण पंतप्रधान मोदींना ती वेदना नाही. ते सतत गप्प बसतात. गृहमंत्र्यांनी सगळे झाल्यानंतर दौरा करून आसामच्या मुख्यमंत्र्यांकडे बोलणी सोपवली. याचाही फारसा परिणाम झालेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT