OLA बूक करतानाचा विक्रम सिंग, राइड संपताच झाला मोहम्मद गुल्फाम; पोटाची खळगी भरण्यासाठी लोक का लपवत आहेत ओळख?

गेल्या अनेक दिवसांपासून अनेक ठिकाणी ग्राहकांना असे अनुभव येत असल्याने अनेक उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
Pradeep Bhandari Tweet
Pradeep Bhandari TweetDainik Gomantak
Published on
Updated on

गेल्या काही वर्षांत देशातील धार्मिक वातावरण मोठा प्रमाणात बदलले आहे. याचा सर्वसामान्यांच्या आयुष्यात मोठा परिणाम होत आहे.

देशात अलिकडील काळात धार्मिक द्वेषाच्या अशा घटना घडल्या आहेत, त्यामुळे लोकांना आपली ओळख लपवावी लागत आहे.

आता असाच ओळख लपवण्याचा एक प्रकार पत्रकार प्रदीप भंडारी यांच्यासोबत घडला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली.

या ट्विटमध्ये प्रदीप भंडारी म्हणाले, मी दिल्लीत ओला कॅब बूक केली. अॅपमध्ये ड्रायव्हरचे नाव विक्रम सिंग असे दाखवले.

मी कारमध्ये बसल्यानंतर ड्राइव्हरला नाव विचारले, त्यानेही विक्रम सिंग असे सांगितले. मात्र, माझी राइड संपल्यानंतर मला धक्काच बसला. मी, त्याला यूपीआय पेमेंट केल्यानंतर तो विक्रम सिंग नसून, मोहम्मद असल्याचे समोर आले.

यावेळी भंडारी यांनी, हा ड्रायव्हर आपले नाव का लपवतोय असा प्रश्न उपस्थित करत, ओलाने याबाबत चौैकशी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

भंडारी यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत ट्विट केल्यानंतर नेटकऱ्यांमधूनही संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. यावेळी विपिन तिवारी नावाच्या एका यूजरने, हा ड्रायव्हर फेक लायसेन्स वापरतोय का? तसे असेल तर हे गंभीर आहे. तो त्याची नक्की अडचण काय आहे? तो ओळख का लपवत आहे? असा प्रश्न विचारला

दुसरी एक JIX5A नावाच्या यूजरने तिचा याबाबतचा अनुभव सांगितला. ती म्हणाली, मला कोणीतरी सांगितले होते की, काही लोक उबर ड्रायव्हर म्हणून रजिस्टर करतात आणि नंतर अवैध कामे करण्यासाठी गाडी दुसऱ्यांच्या ताब्यात देतात. हे असे प्रकार काही वर्षांपूर्वी लंडनमध्ये घडायचे.

Pradeep Bhandari Tweet
ED raids Senthil Balaji: ईडीचा छापा, मंत्र्याची जोरजोरात रडारड आणि आता बायपास सर्जरी; नाट्यमय घडामोडींनी रंगली ईडी ची छापेमारी

पत्रकार प्रदीप भंडारी यांच्या ट्विटवरील प्रतिक्रियांमध्ये, एक प्रतिक्रिया अशीही होती ज्यामध्ये अरविंद नावाचा यूजरने धार्मिक आणि वांशिक द्वेषाबाबत भाष्य केले आहे.

अरविंद म्हणतात, हा ड्रायव्हर अवैध स्थलांतरीत असण्याची शक्यता आहे. कींवा मुस्लिम धर्मियांच्या विरोधात होणाऱ्या हिंसेमुळे त्याने आपले नाव बदलले असेल.

मी काही देशांमध्ये भारतीयां विरोधात होणाऱ्या वर्णभेदी आणि वांशिक टीका टाळण्यासाठी नाव बदलले होते.

Pradeep Bhandari Tweet
Punjab Govt Land in Goa: गोव्यातील 8 एकर जमीन दिली फाईव्ह स्टार हॉटेलला; पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांची होणार चौकशी

पत्रकारा प्रदीप भंडारी यांच्या ट्विटमुळे ट्विटरवर जोरदार चर्चा सुरू आहेत. काहीजण भंडारी यांच्याशी सहमत आहेत. तर काहीजण त्यांच्या ट्विटशी असहमत असून, त्यांना उत्तर देत आहे. यामध्ये असेही काही पॅरोडी अकाउंट आहेत ज्यांनी भंडारी यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

हे सर्व असले तरी, गेल्या काही वर्षांमध्ये लोकांना आपली खरी ओळख लपवावी लागत आहे. यामागे काय कारणे आहेत? हे कशामुळे होत आहे? याचा सर्वांनी विचार करण्याची गरज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com