Manik Saha Dainik Gomantak
देश

कोण आहेत माणिक साहा, त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार

त्रिपुराच्या (Tripura) राजकारणात शनिवारी (14 मे) अचानक खळबळ उडाली.

दैनिक गोमन्तक

त्रिपुराच्या राजकारणात शनिवारी (14 मे) अचानक खळबळ उडाली. बिप्लब देब यांनी अचानक मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, तोही स्वीकारण्यात आला. यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांबाबत अटकळ सुरु झाली आणि अखेर माणिक साहांचे नाव पुढे आले. या अहवालात आपल्याला माहित आहे की, कोण आहेत माणिक साहा, कोण त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होणार? (Manik Saha is the state president of Tripura BJP)

कोण आहेत माणिक साहा?

मिळालेल्या माहितीनुसार, माणिक साहा हे त्रिपुरा (Tripura) भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष आहेत, जे आता बिप्लब कुमार देब यांच्या जागी त्रिपुराचे मुख्यमंत्री होणार आहेत. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे राज्यात तब्बल वर्षभरानंतर विधानसभा निवडणुका (Assembly Elections) होणार आहेत. अशा स्थितीत बिप्लब कुमार देब यांनी राजीनामा देताच भाजपने माणिक साहा यांचे नाव पुढे केले. बिप्लब देब यांच्या राजीनाम्यानंतर आता सर्वांच्या नजरा माणिक साहा यांच्याकडे लागल्या आहेत.

असा माणिक साहांचा राजकीय प्रवास

माणिक साहा हे पेशाने डेंटिस्ट आहेत. गेल्या वर्षी ते राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते आणि असे करणारे ते त्रिपुरातील एकमेव नेते आहेत. 2016 मध्ये साहा यांनी काँग्रेस (Congress) सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला, त्यानंतर 2020 मध्ये त्यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, माणिक साहा हे त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. राजकारणात येण्यापूर्वी माणिक साहा त्रिपुरा मेडिकल कॉलेजमध्ये शिकवायचे. माणिक साहा आता बिप्लब देब यांच्या जागी त्रिपुराचे मुख्यमंत्री होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, बिप्लब देब यांनी त्रिपुरातील 25 वर्षे जुनी डाव्यांची सत्ता उलथवून टाकली आणि 2018 मध्ये भाजपला विजय मिळवून दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly: घरे नियमनाचे पहिले पाऊल! सरकारी जमिनींवरील 400 चौ.मी. जागेतील बांधकामे होणार नियमित, विधेयक सादर

Rashi Bhavishya 31 July 2025: व्यवसायात लाभ,खर्चावर नियंत्रण ठेवा; अनावश्यक वाद टाळा

Cordelia Cruise: पश्चिम किनारपट्टीवरील सफरनामा! कोची ते गोवा करा 5 दिवसांची 'ओशन ड्रीम्स' सफर; कोर्डेलिया क्रूझचं नवं पॅकेज

Goa: वेटरकडून हॉटेलच्या मालकीणीवर बलात्कार, तोंडावर उशी ठेऊन दिली जीवे मारण्याची धमकी; आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

Goa Schools: राज्यातील शाळांमध्ये आता 'वॉटर ब्रेक'! विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी मिळणार 2 मिनिटांचा वेळ; शिक्षण खात्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT