Karnataka High Court  Dainik Gomantak
देश

Karnataka High Court: कर्नाटक उच्च न्यायालयात उडाला गोंधळ; मुख्य न्यायमूर्तींसमोरच व्यक्तीने स्वतःवर केला हल्ला

Karnataka High Court: म्हैसूर येथील एका 51 वर्षीय व्यक्तीने कर्नाटक उच्च न्यायालयात चाकूने स्वत:वरच हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने एकच गोंधळ उडाला.

Manish Jadhav

Karnataka High Court: म्हैसूर येथील एका 51 वर्षीय व्यक्तीने कर्नाटक उच्च न्यायालयात चाकूने स्वत:वरच हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने एकच गोंधळ उडाला. बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोर्टरुम क्रमांक 1 मध्ये ही घटना घडली. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एनव्ही अंजारिया आणि न्यायमूर्ती एचबी प्रभाकर शास्त्री यांच्या खंडपीठासमोर एका प्रकरणाची सुनावणी सुरु होती. म्हैसूरमधील विजयनगरातील एस चिन्नम श्रीनिवास या व्यक्तीला आत्महत्येच्या प्रयत्नानंतर बॉरिंग हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवास नावाचा व्यक्ती कोर्ट रुममध्ये गेला आणि त्याने काही फाईल्स कोर्टाच्या अधिकाऱ्याला दिल्या. तो खंडपीठासमोर काहीतरी बोलला, मात्र अधिकाऱ्यांनी त्याला कामकाजात अडथळा आणण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने चाकू काढला आणि स्वत:वरच हल्ला केला. या घटनेने हादरलेल्या खंडपीठाने न्यायालयीन कर्मचाऱ्यांना कोर्टरुमबाहेर उपस्थित असलेल्या पोलिसांना या घटनेविषयी कळवण्यास सांगितले. पोलिसांनी तात्काळ कोर्टरुमध्ये पोहोचून त्याला रुग्णालयात नेले. दरम्यान, श्रीनिवासच्या प्रकृतीचे कारण देत डॉक्टरांनी पोलिसांना त्याचा जबाब घेण्यापासून रोखले. श्रीनिवासची पत्नी उमा देवी यांनी पोलिसांना सांगितले की, श्रीनिवास एवढे कठोर पाऊल उचलेल याची तिला कल्पना नव्हती.

उमा देवी म्हणाल्या की, 2021 मध्ये म्हैसूरमध्ये हैदराबादस्थित बांधकाम कंपनीविरुद्ध दाखल करण्यात आलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली तेव्हा श्रीनिवास नाराज झाला होते. व्यवस्थापनाने 93 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. जुलै 2023 मध्ये एफआयआर रद्द केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

पोलीस सूत्राने सांगितले की, 2021 च्या एफआयआरनुसार, बिल्डर्सनी श्रीनिवाससोबत करार केला होता. त्यांनी त्याला हैदराबादमध्ये बांधल्या जाणाऱ्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये हिस्सेदारी देण्याचे आश्वासन दिले होते. तथापि, श्रीनिवासने दावा केला की, कंपनीने दिलेले वचन पाळले नाही. त्यानंतर त्याने कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केली. मात्र, न्यायालयाने एफआयआर रद्द करुन ही दिवाणी बाब असल्याचे सांगितले आणि त्याला याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT