Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: रेल्वे ट्रॅकवर बसलेल्या आजोबांचा थरारक व्हिडिओ व्हायरल, थोडक्यात बचावले; नेटकरी म्हणाले, 'बाबांचं यमराजासोबत उठणं-बसणं दिसतयं!'

Shocking Train Stunt Video: सोशल मीडियावर अनेक वेळा असे व्हिडिओ व्हायरल होतात, जे योगायोगाने (Accidentally) कॅमेऱ्यात कैद झालेले असतात.

Manish Jadhav

Shocking Train Stunt Video: सोशल मीडियावर अनेक वेळा असे व्हिडिओ व्हायरल होतात, जे योगायोगाने (Accidentally) कॅमेऱ्यात कैद झालेले असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, जो पाहून अनेक लोक आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने जवळून जाणाऱ्या भरधाव ट्रेनसमोर दाखवलेले धाडस (Stunt) पाहून यूजर्स म्हणत आहेत की, "या आजोबांचे यमराजासोबत उठणे-बसणे आहे!"

आधी हा व्हिडिओ पाहा!

व्हिडिओमध्ये काय दिसले?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Video) एक रेल्वे स्टेशन दिसत आहे. प्लॅटफॉर्मवरुन एक ट्रेन भरधाव वेगाने जाणार असल्याने प्लॅटफॉर्मवर उभे असलेले लोक सुरक्षिततेसाठी थोडे मागे सरकतात. तेवढ्यात एक अत्यंत धक्कादायक दृश्य कॅमेऱ्यात कैद होते. एक वयस्कर व्यक्ती (आजोबा) प्लॅटफॉर्मवरुन खाली रेल्वे ट्रॅकवर बसलेले दिसत आहेत. ते ट्रॅकवर कशासाठी बसले होते, हे स्पष्ट होत नाही. पण ट्रेन जवळ येताना पाहून ते घाई गडबडीने उठतात.

दरम्यान, ट्रेनचा वेग जास्त असल्याने ती थांबणे शक्य नव्हते. त्यामुळे लोको पायलट हॉर्न वाजवत होता. या सगळ्या गोंधळात ट्रेन (Train) त्या व्यक्तीच्या अगदी जवळून वेगाने निघून जाते. सुदैवाने, या आजोबांना काहीही होत नाही आणि ते मृत्यूच्या दाढेतून सुरक्षितपणे वाचतात.

व्हिडिओ व्हायरल, युजर्सच्या प्रतिक्रिया

हा थरारक व्हिडिओ 'एक्स' प्लॅटफॉर्मवर @Anand_thunder नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. 'लगता है चाचा का यमराज के साथ उठना बैठना है' असे कॅप्शनही त्याला देण्यात आले आहे.

व्हिडिओवर आलेल्या काही मजेशीर प्रतिक्रिया:

  • एका युजरने लिहिले: "आजोबा चहा-नाश्ता यमराजासोबतच करतात वाटतं."

  • दुसऱ्या युजरने म्हटले: "हे आजोबा स्टंटमॅन बनत आहेत."

  • एका युजरने चिंता व्यक्त केली: "चप्पलच्या नादात आजोबांनी जीव गमावला असता."

  • अन्य एका युजरने लिहिले: "अरे यार, इतकीही काय घाई होती आजोबा!"

  • एका युजरने या घटनेचे वर्णन 'मौत के मुंह से टक से वापसी' असे केले आहे.

या व्हायरल व्हिडिओने लोकांना क्षणभर आश्चर्याचा धक्का दिला असला तरी, रेल्वे ट्रॅकवर असे धोकादायक कृत्य करणे किती जीवघेणे ठरु शकते, हेही यातून स्पष्ट होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Xavier Novena: गोंयच्या सायबाचा नोव्हेना होणार सुरु! जुन्या गोव्यात भाविकांची मांदियाळी; वाचा सविस्तर माहिती

Goa Politics: "पक्षांतरबंदी हेच माझं उत्तर..." असं का म्हणाले विजय सरदेसाई? 2027 पर्यंत काँग्रेस आघाडीसोबत राहण्याचं केलं स्पष्ट

VIDEO: मिचेल स्टार्कचा 'वन हँड' चमत्कार! स्वतःच्या गोलंदाजीवर डाईव्ह मारुन पकडला अविश्वसनीय झेल; पाहून तुम्हीही व्हाल थक्क

T20 World Cup 2026: भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, टी-20 वर्ल्डकपचे शेड्यूल लवकरच होणार जाहीर, आयसीसी मुंबईत करणार मोठी घोषणा

'Mhaje Ghar योजने'त 2 मोठे निर्णय! CM सावंतांचा दिलासा, 'घर मिळाले, पण...' नेमकं काय म्हणाले? वाचा

SCROLL FOR NEXT